कोरोना नियंत्रणासाठी हेल्पलाईन उप युक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 12:07 AM2020-10-14T00:07:42+5:302020-10-14T01:11:58+5:30

नाशिक: माझे कुटंूब-माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या दुसऱ्या टप्पयात अतिशय काळजीपुर्वक सर्वेक्षण करावे लागणार असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कोरोना बाधित शोधून काढण्यासाठी हेल्पलाईन सारखी सुविधा सुरू करावी असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

Helpline sub for corona control | कोरोना नियंत्रणासाठी हेल्पलाईन उप युक्त

कोरोना नियंत्रणासाठी हेल्पलाईन उप युक्त

googlenewsNext
ठळक मुद्देबाधित रुग्ण शोधून त्यावर वेळेत उपचार होणे अत्यावश्यक

नाशिक: माझे कुटंूब-माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या दुसऱ्या टप्पयात अतिशय काळजीपुर्वक सर्वेक्षण करावे लागणार असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कोरोना बाधित शोधून काढण्यासाठी हेल्पलाईन सारखी सुविधा सुरू करावी असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

जिल्'ातील सर्व मुख्याधिका?्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, तहसीलदार राजेंद्र नजन आणि जिल्'ातील सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.

कोरोना संसगार्ला अटकाव करण्यासाठी बाधित रुग्ण शोधून त्यावर वेळेत उपचार होणे अत्यावश्यक असल्याचे सांगून या मोहिमेद्वारे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. सर्व मुख्याधिकाºयांनी प्रभावी अंमलबजावणी करून या मोहिमेबाबत जनतेला आवाहन करण्याचे देखील त्यांनी सांगितले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या माझी वसुंधरा योजनेच्या अमलबजावणीसाठी समिती गठीत करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेशही मुख्याधिकाºयांना देण्यात आले.

 

Web Title: Helpline sub for corona control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.