बिलवाडी शिवारातील हेमाडपंथी शिवमंदिर दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 11:07 PM2022-02-12T23:07:16+5:302022-02-12T23:07:50+5:30

मनोज देवरे, कळवण : तालुक्यात देवळीकराड, मार्कंडपिंप्री आणि बिलवाडी येथे प्राचीन शिव मंदिरे आहेत. परंतु बिलवाडी येथील शिव मंदिर ...

Hemadpanthi Shiva temple in Bilwadi Shivara neglected | बिलवाडी शिवारातील हेमाडपंथी शिवमंदिर दुर्लक्षित

बिलवाडी शिवारातील हेमाडपंथी शिवमंदिर दुर्लक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देपुरातत्व खात्याची उदासीनता : मंदिर परिसराच्या विकासाची मागणी




मनोज देवरे, कळवण : तालुक्यात देवळीकराड, मार्कंडपिंप्री आणि बिलवाडी येथे प्राचीन शिवमंदिरे आहेत. परंतु बिलवाडी येथील शिवमंदिर अतिशय देखणे असूनही या मंदिराकडे प्रशासनाने व पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे मंदिराचा काही भाग ढासळू लागला आहे. कळवण पासून अभोण्याच्या पश्चिमेला सुमारे ३० कि.मी वर बिलवाडी हे आदिवासी बहुल गाव असून या गावाची लोकसंख्या दोन हजारच्या आसपास आहे. या गावाच्या शिवारात सुमारे १२ हेमाडपंथी मंदिरे होती. त्यात काही शिवमंदिरे, काही भगवान महावीर तर काही विष्णूची मंदिरे होती. त्यापैकी ११ मंदिरे पूर्णपणे ढासळून मातीत गाडली गेली आहेत. तरीही त्याजागी आजही मंदिराच्या दगडांचे बरेचसे अवशेष पहायला मिळतात. या मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी आजही शिवलींग,भगवान विष्णू,शंकर,गणेश,भगवान महावीर यांच्या मूर्त्या आढळतात. त्या येथील ग्रामस्थांनी गावातील मारुती मंदिरात आणून जपून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच बिलवाडी शिवारात जेथे जेथे अशी मंदिरे होती. तेथे याच दगडात बांधलेली मोठमोठे तलाव तथा तळी आणि एक विहीर सुद्धा होती. परंतू अलिकडेच येथील आदिवासी बांधवांनी ती तळी व विहिरी सपाट करून त्याजागी शेती करण्यास सुरुवात केली आहे.

कळवण तालुक्यातील देवळीकराड व मार्कंडपिंप्री येथील हेमाडपंथी मंदिरांना अलिकडेच क वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा दिल्याने येथील मंदिर व परिसराची मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे. परंतू बिलवाडी येथील शिव मंदिराकडे प्रशासनाने व पुरातत्व खात्याने सतत दुर्लक्ष केल्यानेच ११ मंदिरे नेस्तनाबूत झाली आहे. आज आहे त्या एकमेव मंदिराकडे तरी तातडीने लक्ष देऊन या मंदिराचा विकास व्हावा अशी गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे.
- डी.एम. गायकवाड, आदिवासी सेवक, बिलवाडी

फोटो- १२ बिलवाडी-१

Web Title: Hemadpanthi Shiva temple in Bilwadi Shivara neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.