हेमंत गोडसेंवर शिवसेना नाराज?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:12 AM2018-08-18T01:12:25+5:302018-08-18T01:12:45+5:30
लोकसभा निवडणुकीची तयारी करताना शिवसेनेने नाशिकची जागा ताब्यात ठेवण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या ऐवजी अन्य पक्षांतील परंतु निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्या उमेदवारांचा शोध घेण्यास सुरुवात केल्यामुळे पक्ष गोडसे यांच्या पाच वर्षांच्या कामगिरीवर नाराज असल्याचा अर्थ काढला जात असून
नाशिक : लोकसभा निवडणुकीची तयारी करताना शिवसेनेने नाशिकची जागा ताब्यात ठेवण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या ऐवजी अन्य पक्षांतील परंतु निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्या उमेदवारांचा शोध घेण्यास सुरुवात केल्यामुळे पक्ष गोडसे यांच्या पाच वर्षांच्या कामगिरीवर नाराज असल्याचा अर्थ काढला जात असून, त्यामुळेच खासदार संजय राऊत यांनी गोडसे यांना डावलून थेट हिरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सेनेचे ‘आवतन’ दिले आहे. हिरे यांनीदेखील शिवसेनेच्या प्रस्तावाला मूक संमती देतानाच खासदारकी व आमदारकी अशा दोन जागांची ‘डिमांड’ ठेवल्यामुळे शिवसेनेबरोबरच राष्टÑवादीतही राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खासदार गोडसे यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्नांचा दिल्लीत पाठपुरावा केला असला तरी, दृष्य स्वरूपात दिसेल असे कोणतेही भरीव काम त्यांच्या कारकिर्दीत उभे राहिलेले नाहीत, शिवाय गेल्या पाच वर्षांपूर्वीच राजकीय परिस्थिती पाहता, सेना-भाजपाने लोकसभेची निवडणूक एकत्र लढविली होती. आता मात्र तशी परिस्थिती दिसत नाही अशा वेळी पक्षाच्या व स्वत:च्या बळावर निवडून येण्याची क्षमता ठेवणाºया उमेदवारांचा शिवसेनेने शोध सुरू केला आहे. त्यातच गोडसे यांचे पक्षातील काही पदाधिकाºयांशी पटत नसल्यामुळे या नाराजीचाही गोडसे यांना फटका बसण्याची शक्यता असून, त्याचाच एक भाग म्हणून मध्यंतरी गोडसे यांनी भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी हालचाल केल्याची चर्चा पक्ष पातळीवर पसरविण्यात आल्याने पक्ष गोडसे यांच्यावर नाराज असल्याचे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून एकच उमेदवार दुसºयांदा निवडून येण्याचा विक्रम भल्या भल्यांना आजवर जमला नाही. त्यामुळे गोडसे यांनी कितीही दुसºयांदा लोकसभेसाठी उमेदवारी करण्याची पक्षाकडे इच्छा प्रदशर््िात केली तरी, पक्ष प्रमुखांच्या मनात काही तरी वेगळे चालले असल्याचे खासदार संजय राऊत यांच्या दोन दिवसांपूर्वी हिरे कुटुंबीयांच्या भेटीमुळे निदर्शनास येत आहे. राऊत यांनी थेट हिरे कुटुंबीयांना शिवसेनेचे आवतन दिले विशेष म्हणजे हिरे कुटुंब राष्ट्रवादीच्या प्रवेशाची तयारी करीत असताना राऊत यांनी सदरचे पाऊल उचलल्याने त्यांच्या या कृत्यास पक्षप्रमुख ठाकरे यांची मान्यता असावी, असा अर्थ शिवसेनेत काढला जात आहे. हिरेंनी राऊत यांना होकार दर्शविला, परंतु त्यासाठी अटी टाकल्या आहेत.