हेमंत टकले यांना राज्यमंत्र्याचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:09 AM2017-12-25T01:09:41+5:302017-12-25T01:12:20+5:30

नाशिक : विधानसभा आणि विधान परिषदेतील पक्ष प्रतोदांना विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे विधान परिषदेतील राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रतोद हेमंत टकले यांनादेखील मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

Hemant Takley's status as the Minister of State | हेमंत टकले यांना राज्यमंत्र्याचा दर्जा

हेमंत टकले यांना राज्यमंत्र्याचा दर्जा

googlenewsNext
ठळक मुद्देहेमंत टकले यांना राज्यमंत्र्याचा दर्जाहिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान हा निर्णय जाहीर


 

नाशिक : विधानसभा आणि विधान परिषदेतील पक्ष प्रतोदांना विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे विधान परिषदेतील राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रतोद हेमंत टकले यांनादेखील मंत्रिपदाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान हा निर्णय जाहीर केला आहे. संसदीय कार्य विभागाच्या अंतर्गत विधिमंडळातील म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषदेच्या मुख्य प्रतोद यांना सेवा देण्याबाबत मंत्रिमंडळाची उपसमिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानुसार सुविधा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विधानसभेच्या सभागृहात सत्तारुढ पक्षाचा आणि घटक पक्षाचा एक मुख्य प्रतोद तर एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य संख्या असलेल्या पक्षांचे प्रत्येकी एक प्रतोद असतील. असे निकष ठरविण्यात आले असून त्यांना अधिवेशन काळात राजशिष्टाचारापुरता मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
शासनाच्या या निर्णयाच्या अनुषंगाने विधान सभेत राष्टÑवादीचे प्रतोद असलेल्या हेमंत टकले यांना राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला असून, त्याच आधारावर भाई गिरकर, नीलमताई गोºहे तसेच संजय दत्त यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असणार आहे.

Web Title: Hemant Takley's status as the Minister of State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक