हेमंत शिबिराची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 10:10 PM2020-01-03T22:10:37+5:302020-01-03T22:11:12+5:30
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हेमंत शिबिराची सांगता झाली. सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळवण शिक्षण संस्थेचे विश्वस्त भूषण पगार, तर वक्ते म्हणून प्रांत संयोजक विठ्ठल शिंदे, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण व शिबिर कार्यवाह पुंडलिक आहेर उपस्थित होते.
कळवण : शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हेमंत शिबिराची सांगता झाली. सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळवण शिक्षण संस्थेचे विश्वस्त भूषण पगार, तर वक्ते म्हणून प्रांत संयोजक विठ्ठल शिंदे, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण व शिबिर कार्यवाह पुंडलिक आहेर उपस्थित होते.
सुनील चव्हाण यांनी हेमंत शिबिराची संकल्पना विशद करून तीन दिवसांतील कामकाजाचा आढावा सांगितला. प्रमुख पाहुणे भूषण पगार यांनी संघाचे समाजासाठी कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. नि:स्वार्थ पणे संघ समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगून आज आपल्या देशासमोरील असलेल्या अनेक आव्हानांना सामोरे जायचे असेल तर संघटित व्हा, अनेक प्रश्न सहज सुटतील असे पगार यांनी सांगितले. सूत्रसंचालन बाबासाहेब गांगुर्डे यांनी केले, तर पद्य स्वप्निल शिरोरे यांनी सादर केले. हेमंत शिबिरात जिल्हा संघचालक गोविंद आहेर, प्रदीप बच्छाव, महेश बंडगर, शुभम जोशी, गंगाधर पगार, कळवण तालुका संघचालक सुभाष देवघरे, तालुका कार्यवाह संजय विठ्ठल पगार, निंबा पगार, प्रसन्न गायधनी यांनी मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी एम.पी. कोष्टी, प्रशांत कोठावदे, रितेश बच्छाव, महेंद्र बच्छाव, संजय महाले, बिरारी, नाना नागमोती, संजय भावसार, दीपक वेढणे, चेतन खैरनार, उत्कर्ष शिंदे, जित पटेल आदींनी परिश्रम घेतले.