जेतवन नगर येथे हर्बल पार्क करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:45 AM2021-01-08T04:45:25+5:302021-01-08T04:45:25+5:30
या रोपवाटिकेस पीपीपी तत्त्वावर विकसित करण्यासाठी महासभेने याआधीच मान्यता दिली आहे. मनपाच्या विकास आरखड्यात मेडिकल ॲम्युनिटी रिझर्वेशन आहे. ही ...
या रोपवाटिकेस पीपीपी तत्त्वावर विकसित करण्यासाठी महासभेने याआधीच मान्यता दिली आहे. मनपाच्या विकास आरखड्यात मेडिकल ॲम्युनिटी रिझर्वेशन आहे. ही जागा ३ हजार ४५५ चौरस मीटर असून प्रत्यक्ष मोजणीनुसार २७ हजार ६८७ चौरस मीटर आहे. त्यापैकी रोपवाटिकेची जागा १४ हजार ४२० तर जॉगिंग ट्रॅक ६ हजार ३०० चौरस मीटर आणि निसर्गोपचार केंद्राची जागा ६ हजार ९६० चौरस मीटर आहे. त्यामुळे या जागेत हर्बल पार्क व महापालिकेची अत्याधुनिक रोपवाटिका विकसित करता येणार आहे.
त्यामुळे या ठिकाणी शैक्षणिक सहली, पर्यटन, मनोरंजन केंद्र यांनादेखील चालना मिळणार आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक न करता प्रवेश शुल्क आकारणी करातून मनपास आर्थिक फायदा होणार आहे. मनपाची ४० ते ५० लाख रुपयांची बचत होईलच परंतु किमान १० लाख रुपये इतके वार्षिक उत्पन्न होणार आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार ७० टक्के गुणवत्ता आणि ३० टक्के आर्थिक देकार या तत्त्वावर ही रोपवाटिका विकसित केली जाणार आहे.
इन्फो...
काय आहे प्रस्ताव
* या रोपवाटिकेतून शाेभिवंत फुलांची कलमे, रोपे तयार करणार
* हिरवळ विकसित करून ती अन्य उद्यानांसाठी देणार
* ऑर्चिड-जरबेरासारखी विदेशी फुलझाडे तयार करणार
* पॉलीहाउस आणि ग्रीन हाउसची निर्मिती
----------
छायाचित्र आर फोटोवर ०७ जेतवन नगर