दह्याणे येथे बाकड्यांवर ओतले आॅइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:34 PM2020-04-03T22:34:20+5:302020-04-03T22:34:42+5:30

चांदवड तालुक्यातील धोंडबेपासून पुढे वणीकडे जाताना दह्याणे हे गाव लागते. येथील काही ग्रामस्थ दररोज सवयीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बाकड्यांवर बसून गप्पा मारताना दिसत आहे. ग्रामपंचायतीने कोरोनाविषयी गावात जनजागृती केली. मात्र नागरिक दाद देत नसल्याने ग्रामपंचायतने शक्कल लढवल आहे.

Here is the pile on the boxes | दह्याणे येथे बाकड्यांवर ओतले आॅइल

चांदवड तालुक्यातील दह्याणे येथे सार्वजनिक बसण्याच्या बाकड्यांवर आॅइल ओतताना ग्रामपंचायतीचे कर्मचारी.

Next

चांदवड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात शहरी भागात गर्दी कमी असलीतरी ग्रामीण भाग यासी अपवाद ठरत आहे. ग्रामीण भागातील तरुण व मध्यमवर्गीय नागरिक लॉकडाउनला जुमानत नसल्याचा अनुभव सर्वत्र येत आहे. चांदवड तालुक्यातील धोंडबेपासून पुढे वणीकडे जाताना दह्याणे हे गाव लागते. येथील काही ग्रामस्थ दररोज सवयीप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बाकड्यांवर बसून गप्पा मारताना दिसत आहे. ग्रामपंचायतीने कोरोनाविषयी गावात जनजागृती केली. मात्र नागरिक दाद देत नसल्याने ग्रामपंचायतने शक्कल लढवल आहे.
ग्रामपंचायत कर्मचायांनी सार्वजनिक ठिकाणी बसण्याच्या बाकांवर आॅईल ओतून ते खराब केले आहे. जेणेकरुन या ठिकाणी गर्दी होणार नाही, असा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला असल्याची माहिती दह्याणेचे माजी सरपंच अ‍ॅड. शांताराम भवर यांनी दिली.

Web Title: Here is the pile on the boxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.