प्रतिजेजुरी मर्हळ येथे आजपासून यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:35 PM2018-01-31T23:35:11+5:302018-01-31T23:59:39+5:30
प्रतिजेजुरी म्हणून लौकिकास पावलेल्या मर्हळ येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवास गुरुवारपासून (दि. १) प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाºया यात्रोत्सवात सुमारे लाखभर भाविक ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा जयघोष व खोबरे-भंडा र्याची उधळण करीत दर्शनासाठी हजेरी लावतात.
निर्हा ळे : प्रतिजेजुरी म्हणून लौकिकास पावलेल्या मर्हळ येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवास गुरुवारपासून (दि. १) प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाºया यात्रोत्सवात सुमारे लाखभर भाविक ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’चा जयघोष व खोबरे-भंडा र्याची उधळण करीत दर्शनासाठी हजेरी लावतात. शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून १० वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. वाघ्यामुरळीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दिवसभर नवसपूर्ती कार्यक्रम पार पडतात. रात्री ९ वाजता तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी सकाळी तमाशा कलावंतांचा हजेरीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल होणार असून, त्यात नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत. शनिवारी यात्रेच्या शेवटच्या दिवशी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. रात्री १० वाजता देव घरी जाण्याच्या कार्यक्रमास प्रारंभ होतो. खंडेराव महाराज पालखीची महाल बागेतून मंदिरापर्यंत भंडाºयाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात येते. यावेळी भाविक हातात बुधली घेऊन देवाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीत सहभागी होतात. यात्रा काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वावी पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सिन्नर आगाराच्या वतीने दिवसभर ‘सिन्नर-निºहाळे’ व ‘पांगरी-मºहळ’ बसेस सुरू असणार आहेत. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी जय मल्हार मित्रमंडळ, सरपंच संगीता बर्डे, सुनीता आहेर, संदीप कुटे, दीपक कुºहे, सचिन कुºहे, बबन कुटे, भाऊसाहेब बोडके, चंद्रकांत कुटे, जयराम कुटे, रमेश कुटे, भगीरथ लांडगे, दत्तू सांगळे, शरद लांडगे व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.