कान्हेरे मैदानावर हेरिटेज क्लॉक टॉवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:57 AM2017-08-10T00:57:26+5:302017-08-10T00:57:32+5:30
मनपाचा प्रस्ताव : मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीच्या टॉवरची प्रतिकृती नाशिक : गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील प्रेक्षक गॅलरीच्या वर सुमारे ४० फूट उंचीचे हेरिटेज क्लॉक टॉवर साकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, येत्या महासभेवर प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता उत्तम पवार यांनी दिली आहे.
मनपाचा प्रस्ताव : मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीच्या टॉवरची प्रतिकृतीलोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील प्रेक्षक गॅलरीच्या वर सुमारे ४० फूट उंचीचे हेरिटेज क्लॉक टॉवर साकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, येत्या महासभेवर प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता उत्तम पवार यांनी दिली आहे. महापालिकेच्या मालकीचे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान नाशिक क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात देण्यात आलेले असून, याठिकाणी क्रिकेटचे मैदान साकारण्यात आले आहे. याच मैदानावर सुमारे २० फूट प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आलेली आहे. मैदानाची एक ओळख तयार व्हावी आणि प्रतीकात्मक स्वरूपात त्याचे बोधचिन्हही साकारले जावे, या उद्देशाने माजी महापौर यतिन वाघ यांनी सन २०१४ मध्ये सदर मैदानावर लॉर्ड्सच्या धर्तीवर हेरिटेज क्लॉक टॉवर उभारण्याची संकल्पना मांडली होती आणि महापौर निधीतून त्यासाठी सुमारे १६ लाख रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली होती. त्यात मनसेच्या नगरसेवक सुजाता डेरे यांनीही सदर टॉवर साकारण्यासाठी त्यांचा नगरसेवक निधी देऊ केला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा क्लॉक टॉवरचा विषय पुढे आला असून, मैदानावर हेरिटेज क्लॉक टॉवर साकारण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केला आहे. सदर क्लॉक टॉवर जुन्या नगरपालिकेच्या इमारतीवरील क्लॉक टॉवरच्या धर्तीवर उभारण्याचे प्रस्तावित आहे. असा असेल क्लॉक टॉवरमेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीवरील टॉवर क्लॉकची हुबेहूब प्रतिकृती फायबरमध्ये साकारली जाणार आहे. त्याची उंची सुमारे ४० फूट असणार आहे. त्यातील घड्याळाची डायल १० फुटाची राहणार असून, लांब अंतरावरूनही या घड्याळाचे दर्शन होणार आहे. सदर क्लॉक टॉवरचे डिझाइन लान्सर कंपनीकडून मागविण्यात आले आहे. सदर कंपनीनेच गंगापूररोडवरील शहीद सर्कलचे डिझाइन केलेले आहे.