नाशिक सायकलिस्टतर्फे त्र्यंबकेश्वर येथे हेरिटेज राईड
By Admin | Published: February 23, 2017 12:21 AM2017-02-23T00:21:25+5:302017-02-23T00:21:42+5:30
नाशिक सायकलिस्टतर्फे त्र्यंबकेश्वर येथे हेरिटेज राईड
नाशिक : बीपीसीएल आणि नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबकेश्वर येथे हेरिटेज राईडचे आयोजन करण्यात आले होते. बीपीसीएलच्या ‘सक्षम’ या उपक्रमांतर्गत या राईडचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या जिल्ह्यातील वारसा लोकांपर्यंत पोहचावा, तसेच तो सर्वांना समजावा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, हा या राईड मागचा मुख्य उद्देश होता. यावेळी त्र्यंबकेश्वर शहराचा ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास असणारे राजेश दीक्षित यांनी यावेळी त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध वारसा स्थळांची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, दीक्षित वाडा, भद्रकाली मंदिर, त्रिभुवनेश्वर मंदिर, गायत्री मंदिर, क्षेत्रपाल, गौतम तलाव, अहिल्या गोदा संगम, गोरक्ष आराखडा, नवा उदासी आखाडा, दांडी स्वामी मठ, भुवनेश्वरी देवी, ब्रह्मा सावित्री मंदिर, निर्मल आखाडा, गंगासागर, निवृत्तिनाथ समाधी, जनार्दन स्वामी मठ, बल्लाळेश्वर, कुशावर्त तीर्थ या ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तूंची माहिती यावेळी देण्यात आली. हेरिटेज राईडमध्ये नाशिक सायकलिस्टच्या सुमारे १०० हून अधिक सदस्यांनी या फेरीत सहभाग नोंदवला. यावेळी नाशिक सायकलिस्टचे मनीषा इंगळे, स्नेहल देव, किरण चव्हाण, कैलास घुले यांच्यासह बीपीसीएलचे विक्रम गुप्ता, विशाल काबरा, गोविंद आचरेकर, रोहित वैशंपायन यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)