हरणबारी ,केळझरचे पाणी पेटण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:46 PM2018-11-28T12:46:20+5:302018-11-28T12:46:32+5:30
सटाणा : तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील शेती सिंचनाच्या आवर्तनाचे चुकीचे नियोजन केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रब्बी हंगाम वाया जावून निवडणुकीचा मुद्दा व्हावा यासाठी हरणबारी धरणाचे प्रथमच हेतू पुरस्कर चुकीचे नियोजन करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतक-यांंकडून व्यक्त होत आहेत.
सटाणा : तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील शेती सिंचनाच्या आवर्तनाचे चुकीचे नियोजन केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रब्बी हंगाम वाया जावून निवडणुकीचा मुद्दा व्हावा यासाठी हरणबारी धरणाचे प्रथमच हेतू पुरस्कर चुकीचे नियोजन करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रि या
शेतक-यांंकडून व्यक्त होत आहेत.
तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने नुकतेच पिण्याच्या पाण्याचे आरक्षण जाहीर केले आहे.हरणबारी मध्यम प्रकल्पातील शिल्लक पाणी साठ्यापैकी ५०० दशलक्ष घनफूट पाणी तर केळझरच्या शिल्लक पाणी साठ्यापैकी २५० दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरिक्षत करण्यात आलेले आहे.दरम्यान उर्वरित पाणी साठ्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी तसेच लोकप्रतिनिधींनी अत्यंत चुकीचे नियोजन केले आहे.यामुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होणार असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.यापूर्वी हरणबारी धरणातून दरवर्षी दोन आवर्तन रब्बीसाठी दिले जात होते.त्यामध्ये अडीचशे ते दोनशे ऐंशी दशलक्ष घनफूट पाण्याचे एक आवर्तन दिले जात .यंदा मात्र डिसेंबर महिन्यातच शिल्लक पाण्यापैकी २० तारखेला ५४६ आणि पुढील दहा दिवसात १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन लोकप्रतिनिधी आण िसंबधित अधिकाºयांच्या बैठकीत जाहीर करण्यात आलेले आहे.मात्र हे नियोजन अत्यंत घातक असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी सांगितले. इतक्या मोठ्याप्रमाणात पाण्याचे पहिले आवर्तन सोडणे म्हणजे पाण्याची नासाडी आहे.यामुळे मोसम खोर्यातील शेती उद्ध्वस्त होईल .एक पाण्यावर रब्बीचे पिक तरी येईल का असा सवाल पगार यांनी उपस्थितीत केला आहे.याचा विचार करून संबधित विभागाने ६४६ दशलक्ष घनफूट शिल्लक पाण्याचे नव्याने नियोजन करून डिसेंबर अखेरीस एक व फेब्रुवारी महिन्याच्या पिहल्या आठवड्यात अशी दोन आवर्तने द्यावीत अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा पगार यांनी दिला आहे.पगार यांच्या भूमिकेमुळे हरणबारीचे पाणी पेटण्याची शक्यता आहे.