शालेय साहित्य देणारा ‘नायक’ हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 06:46 PM2020-04-30T18:46:37+5:302020-04-30T18:47:03+5:30

वैतरणानगर : प्रख्यात अभिनेता इरफान खान यांच्या अकाली निधनाने इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्र्याच्यावाडी व कुशेगावमधील त्याच्या आदिवासी व गोरगरीब चाहत्यांना दु:ख झाले.

 The 'hero' who gave school materials was lost | शालेय साहित्य देणारा ‘नायक’ हरपला

शालेय साहित्य देणारा ‘नायक’ हरपला

Next

वैतरणानगर : प्रख्यात अभिनेता इरफान खान यांच्या अकाली निधनाने इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्र्याच्यावाडी व कुशेगावमधील त्याच्या आदिवासी व गोरगरीब चाहत्यांना दु:ख झाले. इगतपुरीसारख्या पर्यटन व निसर्गरम्य आदिवासी तालुक्याची खान यांचे विशेष प्रेम होते. त्रिंगलवाडी येथील पत्र्याचा पाडा येथील प्राथमिक शाळेतील आदिवासी मुलांना दरवर्षी हक्काची शालेय साहित्य व मदतीची भेट देणारा ‘नायक’ हरपल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
आपल्या प्रत्येक भेटीत इरफान खान हे शाळेतील मुलांसमवेत संवाद साधत. त्यामुळे मुले व इरफान खान यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला. त्यामुळे दरवर्षी या विद्यार्थ्यांना स्वेटर, रेनकोट, दफ्तर, वह्या पुस्तके व चप्पल बूट तसेच शाळेला खेळाचे साहित्य आदी साहित्य हक्काने देत.

Web Title:  The 'hero' who gave school materials was lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक