भुजबळ खटल्याच्या  सुनावणीत हिरेंची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:01 AM2017-11-01T01:01:43+5:302017-11-01T01:01:49+5:30

पंधरा दिवसांपूर्वी वाढदिवसानिमित्त जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचे अभीष्टचिंतन करणारे फलक मालेगाव बाह्य (दाभाडी) मतदारसंघात सर्वत्र झळकल्यानंतर होणाºया चर्चेची धूळ खाली बसत नाही तोच, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात भुजबळ यांच्या जामिनावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान माजी आमदार प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे व भाजपावासीय माजी आमदार संजय पवार यांनी दिवसभर न्यायालयात लावलेल्या हजेरीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Hero's presence in Bhujbal hearing hearing | भुजबळ खटल्याच्या  सुनावणीत हिरेंची उपस्थिती

भुजबळ खटल्याच्या  सुनावणीत हिरेंची उपस्थिती

Next

नाशिक : पंधरा दिवसांपूर्वी वाढदिवसानिमित्त जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचे अभीष्टचिंतन करणारे फलक मालेगाव बाह्य (दाभाडी) मतदारसंघात सर्वत्र झळकल्यानंतर होणाºया चर्चेची धूळ खाली बसत नाही तोच, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात भुजबळ यांच्या जामिनावर सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान माजी आमदार प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे व भाजपावासीय माजी आमदार संजय पवार यांनी दिवसभर न्यायालयात लावलेल्या हजेरीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. भुजबळ यांच्या संकटकाळी स्वकीयांनी पाठ फिरविल्याची चर्चा अधूनमधून होत असताना एकेकाळी भुजबळ यांना कट्टर वैरी मानणाºयांना आलेल्या प्रेमामुळे भुजबळ समर्थकही हरकून गेले आहेत.  नांदगाव मतदारसंघातून भुजबळपुत्र आमदार पंकज यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविलेल्या हिरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या राजकीय मत परिवर्तनाचा ठाव अद्याप कोणाला लागू शकलेला नसल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी अद्वय  हिरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर या भेटीचा राजकीय अर्थ निघू नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली गेली. मंगळवारी भुजबळ यांच्या जामीन अर्जावर दिवसभर युक्तिवाद पूर्ण झाला.  आता सरकार ८ नोव्हेंबर रोजी त्यावर आपले म्हणणे मांडणार आहे.
यापूर्वीही भेट
न्यायालयीन कामासाठी गेल्यावर भुजबळ यांची भेट झाली असे तोकडे समर्थन संबंधितांकडून करण्यात आले, परंतु कोंबडे कितीही झाकले तरी आरवते, या उक्तीप्रमाणे भुजबळ यांची भेट घेण्यामागचे राजकीय कारण अखेर दडू शकले नाही. ज्यांनी भुजबळ यांची छुपी(?) भेट घेतली त्यांनी नंतर आगामी विधानसभा निवडणूक मालेगाव बाह्य या हिरे खानदानाच्या पारंपरिक मतदारसंघातून लढण्याची घोषणा केल्यामुळे भेटीमागचा अर्थ स्पष्ट झाला. भुजबळ यांनी गिरणा कारखाना विकत घेतला असून, अद्यापही कारखान्यामुळे त्यांचे या मतदारसंघातील लोकांशी संबंध आहेत, याशिवाय मतदारसंघातील ओबीसी समाज भुजबळ यांच्याशी जोडला गेलेला असल्याने त्यांच्या राजकीय मदतीची गरज भासल्याविना काही गोष्टी शक्य नसल्याचे संबंधित जाणून आहेत. अशा परिस्थितीत भुजबळ यांच्याशी असलेले आजवरचे वैर विसरून जाणे व त्यांच्या न्यायालयीन सुनावणीत जाणीवपूर्वक दिवसभर कोर्ट हॉलमध्ये बसून युक्तिवाद ऐकणे हे कोणत्याही भुजबळ समर्थकाच्या नजरेतून सुटलेले नाही.

Web Title: Hero's presence in Bhujbal hearing hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.