अवघ्या तेरा वर्षांच्या हेतकुमारने घेतली संन्यास दीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 01:13 AM2022-06-04T01:13:16+5:302022-06-04T01:13:39+5:30
कठीण तपस्या, खडतर प्रवास, संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहणाऱ्या जैन गुरूप्रमाणेच डोंबिवली येथील आठवीमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि अवघ्या तेरा वर्षांचा असलेल्या हेतकुमार पीयूषभाई दोषी यांनी जैन धर्माची संन्यासदीक्षा घेतली.
नाशिकरोड- कठीण तपस्या, खडतर प्रवास, संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहणाऱ्या जैन गुरूप्रमाणेच डोंबिवली येथील आठवीमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि अवघ्या तेरा वर्षांचा असलेल्या हेतकुमार पीयूषभाई दोषी यांनी जैन धर्माची संन्यासदीक्षा घेतली. त्यानिमित्ताने लँमरोड येथील कलापूर्णम जैन तीर्थधाममध्ये शुक्रवारी (दि. ३) धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, तसेच दीक्षेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना प्रितिदानाचे वाटप करण्यात आले.
जैन समाजात दीक्षा घेण्याला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. शुक्रवारी (दि. ३) सकाळी ७ वाजता हेतकुमार याने संन्यास-दीक्षा घेतली. यानिमित्ताने त्याने बालगृहरोडवरील श्री क्षेत्र कलापूर्णम तीर्थ धाम येथे तपस्वीरत्न आचार्यदेव हंसरत्नसुरीश्वरजी महाराज, श्रीमद आचार्यदेव तत्त्वदर्शनसुरीश्वरजी महाराज यांच्या मुख्य उपस्थितीत दीक्षा ग्रहण केले. या वेळी आयोजित कार्यक्रमात हेतकुमार यांच्या परिवारातील सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी कमलेश संघवी यांनी जैन धर्मातील दीक्षेचे महत्त्व विशद केले. विश्वस्त लालजी कारिया, प्रेमजी छेडा, दामजी फरिया, चापसी चरला आदी उपस्थित होते. या वेळी हेतकुमार यांच्या हस्ते नागरिकांना प्रितिदानाचे वाटप करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
छायाचित्र आर फोटोवर ०३ हेतकुमार