लपून छपून गेले... परंतु सारे एकत्रच भेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:23 AM2019-11-16T01:23:05+5:302019-11-16T01:23:32+5:30
शुकवारचा दिवस....महापौरपदाची सारे इच्छुक उठले....आपापल्या कुटुंबीयांना सांगून मुंबईला निघाले खरे, परंतु पक्षातील अन्य कोणाला आणि विशेष करून प्रतिस्पर्ध्यांना आपल्या वारीविषयी कळणार नाही याची काळजी घेतली...कोणी कसे कोणी कसे परंतु सारेच मुंबईला गेले.
नाशिक : शुकवारचा दिवस....महापौरपदाची सारे इच्छुक उठले....आपापल्या कुटुंबीयांना सांगून मुंबईला निघाले खरे, परंतु पक्षातील अन्य कोणाला आणि विशेष करून प्रतिस्पर्ध्यांना आपल्या वारीविषयी कळणार नाही याची काळजी घेतली...कोणी कसे कोणी कसे परंतु सारेच मुंबईला गेले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे गेले खरे परंतु त्यांनी साऱ्यांनाच दिलेली एक वेळ निघाली आणि गुपचूप आलेले सारेच एकत्र भेटले...मला न कळविता कसे येथे आलात कसे हं... पण मीही उस्ताद, आलोच ना येथे तुम्हाला शोधत असेच साऱ्यांच्या चेहेºयावर भाव होते आणि ते लपून राहिले नाही ! साºयांचे चेहेरे पाहण्याजोगे झाले होते.
महापौरपदाची निवडणूक होण्याआधीच अनेक जण बाशिंग बांधून बसले आहेत. आज ना उद्या ती वेळ आली की, मग मैदानात उतरायचे अशी तयारीच सुरू होती. सातपूरचे अण्णा आधी विधानसभेसाठी इच्छुक होते. ती संधी गेली तरी त्यांनी मग महापौरपदावर दावा केला. त्यासाठी त्यांना म्हणे वरिष्ठांनीच शब्द दिला आणि मग ते गुमान पक्षाच्या कामाला लागले. असाच प्रकार पंचवटीच्या बाबांचा झाला. बाबाही पूर्व मतदारसंघासाठी दावेदार होते, त्यांनी त्यासाठी जंग जंग पछाडले आणि बाळासाहेबांचा पत्ता साफ करण्याची म्हणे व्यवस्था केली. परंतु दुर्दैव आड आले. पक्षाने आयात उमेदवाराला संधी दिली
राजकारणात सर्व काही खुले आमपणे करता येत नाही काही गोष्टी लपून छपून कराव्या लागतात. मग योग्यवेळी त्यांची उकल करायची असते. भाजपात असे घडलेही, परंतु लपून छपून गेलेले अण्णा, बाबा, नाना, दादा सारेच इच्छुक मुंबईत एका ठिकाणी एकत्र आले आणि मग कळले सारेच एका ठिकाणी आलेत आणि साºयांची पंचाईत झाली. मग त्यावर काय बोलणार साºयांनीच एकमेकांची विचारपूस केली आणि जाहीररीत्या कोणीच आपले पत्ते खुले केले नाही.