पारंबी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हायफायला मानांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 09:02 PM2021-08-29T21:02:02+5:302021-08-29T21:02:45+5:30
मालेगाव : पारंबी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जयराम माळी यांच्या हाय-फाय; वे टु मँगो ट्रीट या लघुपटाला नामांकन मिळाले आहे. त्याचे ऑनलाइन प्रदर्शन मुंबई येथे रविवारी (दि. २९) झाले. अनेक देशविदेशातील लघुपट या महोत्सवात सहभागी झाले होते.
मालेगाव : पारंबी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जयराम माळी यांच्या हाय-फाय; वे टु मँगो ट्रीट या लघुपटाला नामांकन मिळाले आहे. त्याचे ऑनलाइन प्रदर्शन मुंबई येथे रविवारी (दि. २९) झाले. अनेक देशविदेशातील लघुपट या महोत्सवात सहभागी झाले होते.
हाय-फाय या लघुपटात आताचे आधुनिक जग, त्यातल्या गरजा किती व कशा काळानुसार बदलतात यावर भर देण्यात आला आहे. ह्यआंगवर शेण घी सोनं इकाले बसनू कोणी घिदं नही; सोनं पांघरी शेण ईकं, पुरणं नही!ह्ण या अहिराणी म्हणीभोवती चित्रपट फिरतो. जगात ठामपणे उभ राहायचं तर येणारी आधुनिकता स्वीकारावी लागेल हेच या लघुपटात प्रकर्षाने दाखवले आहे. यात प्रमुख भूमिकेत जीवन महिरे व प्रणय पवळे आहेत. तसेच सहकलाकार कुणाल जाधव, रोहन कांबळे आहेत. लेखन दिग्दर्शन जयराम माळी यांनी केले आहे. या लघुपटासाठी प्रा. देवेंद्र सोनवणे, डॉ ज्ञानेश्वर सोनवणे, प्रा. प्रवीण पाटील, नीरज देवरे, राहुल जाधव यांचं मार्गदर्शन लाभले.
जागतिकीकरण व आधुनिकता ही काळाची गरज असताना काही घटक मुळात आहे, त्या जागेवर राहिले. आधुनिकता न स्वीकारता ताठर राहणे त्यांच्या प्रगतीला खीळ बसणारे ठरले. आधुनिक जगात जितके प्रेझेन्टेबल राहाल तेवढे यश तुमच्या वाटेला येईल हेच दाखविण्याचा माझा हाय-फाय; वे टू मँगो ट्रीटमधून प्रामाणिक प्रयत्न आहे.
- जयराम माळी, लेखक/ दिग्दर्शक
यापूर्वी जयराम माळी यांनी झिरा नावाचा लघुपट केला होता. त्याला विदेशातील बोस्निया येथे विवा फिल्म फेस्टिव्हल या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नामांकन मिळाले होते. तसेच कोरोना झोन नावाचा लघुपट यालाही सेवंथ कलर्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे.