पोलीसपाटील मुलाखतींना उच्च न्यायालयाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:34 PM2018-01-08T23:34:05+5:302018-01-08T23:39:59+5:30

नाशिक : पोलीसपाटील भरतीत अन्याय झालेल्या उमेदवारांची फेरमुलाखत घेण्याच्या मॅटच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्यामुळे सोमवारी निफाडच्या प्रांत अधिकाºयांसमक्ष होणाºया उमेदवारांच्या तोंडी मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्या सहा गावांतील पात्र ठरलेल्या अठरा उमेदवारांना मॅटने प्रतिवादी करून घ्यावे, असे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे मॅटपुढे नव्याने सुनावणी होणार आहे.

High court adjournment to police interview interviews | पोलीसपाटील मुलाखतींना उच्च न्यायालयाची स्थगिती

पोलीसपाटील मुलाखतींना उच्च न्यायालयाची स्थगिती

Next
ठळक मुद्देपात्र ठरलेल्या अठरा उमेदवारांना मॅटने प्रतिवादी करून घ्यावे, असे आदेश उमेदवारांच्या फेर मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या

नाशिक : पोलीसपाटील भरतीत अन्याय झालेल्या उमेदवारांची फेरमुलाखत घेण्याच्या मॅटच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्यामुळे सोमवारी निफाडच्या प्रांत अधिकाºयांसमक्ष होणाºया उमेदवारांच्या तोंडी मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्या सहा गावांतील पात्र ठरलेल्या अठरा उमेदवारांना मॅटने प्रतिवादी करून घ्यावे, असे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे मॅटपुढे नव्याने सुनावणी होणार आहे.
जिल्ह्णातील जवळपास सर्व तालुक्यांतील शेकडो रिक्त असलेली पोलीस पाटील व कोतवालांची भरती करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचे व दहा गुण कागदपत्रांना व दहा गुण तोंडी मुलाखतीसाठी देण्याचे धोरण निश्चित केले होते व त्या त्या उपविभागीय अधिकाºयांना या भरतीचे प्रमुख म्हणून नेमण्यात येऊन ही भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. जिल्ह्णातील अन्य तालुक्यांमध्ये या भरतीविषयी उमेदवारांच्या फारशा तक्रारी नसल्या तरी, निफाड व सिन्नर या दोन तालुक्यांत मात्र मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला होता व तशी तक्रार त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. जिल्हाधिकाºयांनी या भरतीची चौकशीही करून अन्याय झालेल्या उमेदवारांची फेर मुलाखत घेण्याच्या सूचना दिल्या होत्या, तथापि, तत्पूर्वीच उमेदवारांनी मॅट तसेच उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुमारे दीड वर्षे पाठपुरावा केल्यानंतर मॅटने अन्याय झालेल्या उमेदवाराच्या बाजूने आपला कौल दिला होता व अन्याय झालेल्या परंतु पात्र ठरलेल्या उमदेवारांच्या फेर मुलाखती घेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले होते. त्यानुसार निफाडच्या प्रांत अधिकाºयांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता फेर मुलाखतीसाठी उमेदवारांना पत्र दिले होते. दरम्यान, सिन्नर तालुक्यातील सहा गावांतील पोलीस पाटील भरतीत अनियमितता असल्याने मॅटने काही ठराविक उमेदवारांच्याच मुलाखतीला परवानगी दिल्याने अन्य पात्र उमेदवारांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात त्यावर सुनावणी होऊन सर्वच उमेदवारांच्या फेर मुलाखती घेण्यात याव्यात, असे निर्देश मॅटला देण्यात आले. त्यामुळे मॅटच्या पुढच्या आदेशापर्यंत मुलाखतींना स्थगिती मिळाल्याने सोमवारी होणाºया उमेदवारांच्या फेर मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Web Title: High court adjournment to police interview interviews

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस