जायकवाडी पाणी प्रश्नावर उच्च न्यायालयात ५ डिसेंबरला सुनावणी
By संजय पाठक | Published: November 7, 2023 06:49 PM2023-11-07T18:49:58+5:302023-11-07T18:50:05+5:30
आज मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात प्राथमिक सुनावणी झाली.
नाशिक- मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठीनाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर या दोन धरण समूहातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता ५ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
आज मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात प्राथमिक सुनावणी झाली यावेळी शासनाला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी २० नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे नाशिकचे शेतकरी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार यांनी भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठिंब्याने ही याचिका दाखल केली आहे गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता त्यानंतर आज यासंदर्भात सुनावणी झाली.
जायकवाडी धरणात पुरेसे पाणी नसल्याने नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरण समूहातून आठ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने घेतला आहे मात्र नाशिक जिल्ह्यातच पुरेसे पाणी नसल्यामुळे नाशिक मधील नागरिक आणि शेतकऱ्यांवर मोठे संकट उदभवणार आहे. त्यामुळे या आदेशाला स्थगिती द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.