मालेगाव स्फोट प्रकरणात ८ जणांना हायकोर्टाची नोटीस

By admin | Published: November 18, 2016 06:55 AM2016-11-18T06:55:25+5:302016-11-18T06:55:25+5:30

मालेगावमध्ये २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातून आठ जणांना उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस बजावली.

High court notice to 8 people in Malegaon bomb blast case | मालेगाव स्फोट प्रकरणात ८ जणांना हायकोर्टाची नोटीस

मालेगाव स्फोट प्रकरणात ८ जणांना हायकोर्टाची नोटीस

Next

मुंबई : मालेगावमध्ये २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात आलेल्या आठ जणांना उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस बजावली. त्यांना आरोपमुक्त करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला राज्य शासनाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर उत्तार देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
बंदी असलेल्या सिमी संघटनेच्या आठही सदस्यांची विशेष न्यायालयाने आरोपमुक्तता केली होती. या निर्णयाविरुद्ध राज्य सरकार उच्च न्यायालयात अपिलात गेले आहे. बॉम्बस्फोटातील आठही आरोपींची आरोपमुक्तता करणचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: High court notice to 8 people in Malegaon bomb blast case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.