जिंदालमधील आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करणार; मृतांना ५ लाखांची मदत, एकनाथ शिंदेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 06:26 PM2023-01-01T18:26:18+5:302023-01-01T18:36:39+5:30
दोन कामगारांचा मृत्यू, 17 जणांना केले रेस्क्यू
- पुरुषोत्तम राठोड/ विक्रम पासलकर
घोटी/गोंदे दुमाला (जि नाशिक): इगतपुरी तालुक्यातील गोंदेदुमाला-वाडीव-हे औद्योगिक वसाहतीत तुलनेने सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेल्या मुंढेगाव शिवारातील आणि मुंबई आग्रा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जिंदाल पॉलीफिल्म प्रा लिमिटेड या कारखाण्यातील पॉलीफायर या प्लांटला आज सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून 17 जणांना रेस्क्यू करण्यात आले. दरम्यान, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे भेटीप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. घटनेतील मृतांना 5 लाखांची मदत देण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले.
या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे धुराचे मोठे लोळ वरती आकाशात निघत होते. ही आग पुढे पाच हजार लीटर क्षमता असलेल्या केमिकलयुक्त दोन्ही टाकयांना भिनली. त्यामुळे आगिने अजुनच जास्त भड़का घेतला. या दोन्ही टाक्या जळून खाक झाल्यामुळे मोठ मोठे स्फोट होऊन सुमारे दहा किमीपर्यंत गावांमध्ये जोरदार हादरे बसून भीतीयुक्त वातावरण तयार झाले होते. दौंडत,मुंढेगाव, माणिकखांब,मुकणे, पाडळी देशमुख,शेनवड खुर्द,पाडळी फाटा आदि सुमारे नऊ ते दहा गावचे नागरिक भयभीत झाले. घरातील भांडे, इतर समान हादरे बसून खाली पडल्यामुळे क्षणभर भूकंप झाला की क़ाय यामुळे नागरिकांना काहीही कळत नव्हते.
विशेष म्हणजे ज्या दोन केमिकल युक्त टाकया जळून खाक झाल्या त्यांचे शेजारिच हजारों टन स्क्रैप मटेरियल ने पेट घेवुन आग वाढत आहे तर तिथेच सुमारे अठरा हजार लीटर क्षमतेची केमिकल भरलेली एक मोठी टाकी असुन आग त्या टाकी पर्यंत जात आहे. जर या टाकिने पेट घेवुन भड़का झालाच तर कारखान्यातील एक पेट्रोल पंप आणि इतर सर्वच ठिकाणी आग लागण्याची चीन्हे दिसत आहे. मुंढेगाव आणि मुकणे या गावाना धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी प्रशासनाने त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.
आज सायंकाळी साडेपाच वाजे पर्यंत आग आटोकयात येण्याची कोणतीही चीन्हे दिसली नाही. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी डी गंगाधरण, तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचेसह जिल्हाभरातील मुख्य पोलिस यंत्रणा व त्यांचे अधिकारी यांनी घटना स्थळी धाव घेवुन मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. अग्निशमन बंब, रुग्णवाहिका या ठिकाणी मदतकार्यासाठी दाखल झाल्या असुन महामार्गाला जत्रे सारखे स्वरूप प्राप्त झाले आहे.
आकाशात सर्वत्र धुराचे लोळ
या आगीमुळे इगतपुरी तालुक्यातील जवळपास पन्नास गावांच्या परिसरात सूर्य आच्छादन झाल्यामुळे पावसाळी वातावरण तयार झाले होते. सायंकाळ पर्यंत हा परिसर काळोखात बुडाला होता. सर्वत्र रुग्णवाहिका त्यांचे सायरन वाजुन आवाज घुमत होता.
शासकीय आश्रमशाळा तत्काळ केली खाली
कंपनी शेजारिच असलेली आणि राज्यातील एकमेव तसेच जिल्हाभरातील शासकीय आदिवाशी आश्रमशाळ तिल विद्यार्थ्याना भोजन व्यवस्था करणारी मुंढेगाव शासकीय निवासी आश्रमशाळा प्रशासनाने आगीचे स्वरूप बघून तासभरात खाली केली. या ठिकाणी हजारों विद्यार्थी शिक्षण घेतात. स्थानिक शेकडो पालकानी या ठिकाणी आपले पाल्य घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तर जिंदाल मधुन बाहेर पडलेले शेकडो कामगार भयभीत होऊन आश्रयीत झालेले दिसले.
कारखान्यातील कामगारांच्या निवासातील घराला स्फोट झाल्यामुळे भयानक हादरे बसले. यात काचा फुटून अनेक कामगार व परिवार जखमी झाल्याचा अंदाज आहे. अंदाजीत साडेतींनशे एकर क्षेत्र असलेल्या जिंदाल कंपनीला या आगीने करोडो रूपयांचे नुकसान झाले असल्याच्या अंदाज आहे. विशेष म्हणजे या कारखान्यात हजारो प्रांतीय कामगार आहे.