कौळाणे गर्भपात प्रकरणाची नाशिकच्या पथकाकडून उच्चस्तरीय चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 05:42 PM2019-01-25T17:42:49+5:302019-01-25T17:43:08+5:30
मालेगाव : गेल्या सोमवारी कौळाणे शिवारात घडलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात स्थानिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेने केलेल्या चौकशीवर व सादर केलेल्या अहवालावर संशय व्यक्त करत आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या चार सदस्यीय पथकाकडून या प्रकरणाची शुक्रवारी चौकशी सुरु केली आहे.
मालेगाव : गेल्या सोमवारी कौळाणे शिवारात घडलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात स्थानिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेने केलेल्या चौकशीवर व सादर केलेल्या अहवालावर संशय व्यक्त करत आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी सहाय्यक आयुक्त दर्जाच्या चार सदस्यीय पथकाकडून या प्रकरणाची शुक्रवारी चौकशी सुरु केली आहे. कौळाणे शिवारातील अवैध गर्भपात केंद्र, चंदनपुरी शिवारात पुरलेल्या अर्भकाचे ठिकाण, सामान्य रुग्णालय, कॉलेज व कॅम्परोडवरील खाजगी रूग्णालयांची तपासणी केली. या चौकशीमुळे अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या व औषधे इंजेक्शन पुरविणाºया खाजगी रुग्णालयांच्या संचालकांचे धाबे दणाणले आहे.
गेल्या सोमवारी तालुक्यातील कौळाणे शिवारात गर्भपात करुन चंदनपुरी शिवारात अर्भक पुरणाºया मानसी अनिल हडावळे, संगम ईश्वर देशमुख, सनी नितीन तुपे, वैष्णवी सनी तुपे या चौघांना किल्ला पोलीसांनी अटक केली होती. सध्या हे चौघे पोलीस कोठडीत आहेत. या घटनेनंतर स्थानिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेने चौकशी सुरू केली होती. या चौकशीत स्थानिक खाजगी रुग्णालय संचालकांना व गर्भपात केंद्रात आढळून आलेल्या व्हीजीटींग कार्ड असलेल्या डॉक्टरांना अभय देण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच चौकशी अहवालात फेरफार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मनसे व भाजपाच्या पदाधिकाºयांनी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी गंभीर दखल घेत नाशिकच्या पथकाकडून चौकशी सुरु केली आहे.