जिल्ह्यात सतरा वर्षांतील उच्चांकी शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:28 AM2017-10-07T01:28:04+5:302017-10-07T01:28:11+5:30
सतरा वर्षांनंतर प्रथमच जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, पहिल्यांदाच आत्महत्या करणाºया शेतकºयाची संख्या ८८वर पोहोचली आहे. यंदा मालेगाव तालुक्यातील शेतकºयांनी सर्वाधिक जीवनयात्रा संपविली आहे.
नाशिक : सतरा वर्षांनंतर प्रथमच जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, पहिल्यांदाच आत्महत्या करणाºया शेतकºयाची संख्या ८८वर पोहोचली आहे. यंदा मालेगाव तालुक्यातील शेतकºयांनी सर्वाधिक जीवनयात्रा संपविली आहे.
कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयांचे आत्महत्येचे प्रमाण यंदाही कायम असून, गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या संपूर्ण वर्षभरात ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा चांगला पाऊस झाल्याने तसेच राज्य सरकारनेही शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केल्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या होणार नाही, असा अंदाज बांधला जात असतानाच जानेवारी महिन्यापासूनच आत्महत्यांचे दृष्टचक्र सुरू झाले. जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी आठ ते नऊ शेतकºयांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण गेल्या नऊ महिन्यांत कायम राहिले. दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील पोपट धोंडीराम चव्हाण (५१) या शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली, तर कळवण तालुक्यातील तिºहळ बु. येथील राजेंद्र धनराज बागुल (२५) या तरुण शेतकºयानेही विषारी औषध घेऊन जीवनयात्रा घोषित केली. त्यामुळे जिल्ह्यातील आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८८ इतकी झाली आहे. गेल्या सतरा वर्षांत म्हणजेच २००१ ते २०१७ या कालावधीत यंदा सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.