वडांगळी उपबाजारात मक्याला उच्चांकी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 02:37 PM2018-12-21T14:37:22+5:302018-12-21T14:37:33+5:30
वडांगळी : एकीकडे भाजीपाला, टमाटा व कांद्याच्या भावात घसरण होत असतांना मक्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
वडांगळी : एकीकडे भाजीपाला, टमाटा व कांद्याच्या भावात घसरण होत असतांना मक्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सिन्नर बाजार समितीच्या वडांगळी उपबाजारात मक्याला १ हजार ७१० रूपये क्विंटल भाव मिळाला. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर ठरला. तालुक्यातील वडांगळी उपबाजारात बुधवारी विविध प्रकारच्या २४ वाहनांतून सुमारे ३०० क्विंटल मका विक्रीसाठी आला होता. त्यात किमान १४०० आणि कमाल १७१० रूपये क्विंटल दराने मका विक्री झाली. सरासरी १६५० रूपये तर मिळाला. खडांगळी येथील पुरूषोत्तम ठोक या शेतकºयाचा एक ट्रॅक्टर व्यापाºयांनी १७१० रूपये क्विंटल दराने खरेदी केली. सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस वडांगळी उपबाजारात शेतीमालाचे लिलाव सुरू असतात. शेतकºयांना मालाची किंमतही जागेवरच अदा करण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, सचिव विजय विखे, वडांगळी बाजाराचे व्यवस्थापक विशाल उगले यांनी दिली. मंगळवारी १६५१ रूपये दराने मका विक्री झाली होती. बुधवारी त्यात आणखी समाधानकारक वाढ झाल्याने शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. १४ पेक्षा कमी आर्द्रता असलेल्या मकाला १७०० रूपये हमीभाव शासनाने जाहीर केला आहे. मात्र, तेवढा दरही यापूर्वी मिळत नसल्याने शेतकºयांत काहीशी नाराजी होती. मात्र, सध्या दराचा आलेख उंचावत असल्याने शेतकºयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. खरेदी विक्री संघाकडून १७५० क्विंटलची खरेदीशासनाने सिन्नर येथील खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून वावी येथे मका आधारभूत खरेदी केंद्र सुरू केले आहे. त्यात बुधवारपर्यंत १७५० क्विंटल मका खरेदी केल्याची माहिती व्यवस्थापक संपत चव्हाणके यांनी दिली. गेल्यावर्षी १४२५ रूपये क्विंटल इतकी मका खरेदीसाठी आधारभूत किंमत ठेवण्यात आली होती. यंदा त्यात मोठी वाढ करत १७०० रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यातील शेतकºयांना आधारभूत खरेदीकेंद्रावर मकाविक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी आवश्यक असून, ३० डिसेंबरपर्यंत ही नोंदणी सुरू ठेवली आहे. आॅनलाईन नोंदणी झालेल्या शेतकºयांची मका आधारभूत खरेदी केंद्रावर खरेदी केली जाणार आहे.