गुराख्यामुळे टळला शाळकरी मुलीवरील अतिप्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:16 AM2017-09-09T00:16:27+5:302017-09-09T00:16:34+5:30
देवळाली कॅम्पच्या कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये शिकणाºया नऊवर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून घेतल्यानंतर दुचाकी साउथ एअरफोर्स रोडवर नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न मुलीच्या ओरडण्याने तसेच तिच्या मदतीसाठी आलेल्या गुराख्यामुळे टळल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़
नाशिक : देवळाली कॅम्पच्या कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये शिकणाºया नऊवर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून घेतल्यानंतर दुचाकी साउथ एअरफोर्स रोडवर नेत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न मुलीच्या ओरडण्याने तसेच तिच्या मदतीसाठी आलेल्या गुराख्यामुळे टळल्याची घटना शुक्रवारी (दि़८) दुपारच्या सुमारास घडली़ नागरिकांनी संशयित नामदेव रामचंद्र घोलप (५०, रा़ चेहेडी नाका, साईदर्शन अपार्टमेंट फ्लॅट नंबर १०२, ता़जि़नाशिक) यास चोप देत पोलिसांच्या हवाली, तर मुलीला तिच्या आईच्या सुपूर्द केले़
देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगूर परिसरातील नऊ वर्षीय मुलगी देवळाली कॅम्पमधील कॅन्टोन्मेंट हायस्कूलमध्ये शिकते़ दुपारी शाळा सुटल्यानंतर झेंडा चौकात रिक्षाची वाट पाहत असताना संशयित नामदेव घोलप (५०) हा दुचाकीवर आला़ त्याने मुलीला जवळ बोलावून घेत कोठे जायचे आहे, अशी विचारणा केली असता तिने भगूरला जायचे आहे, असे सांगितले़ यानंतर मुलगी दुचाकीवर बसली असता तिला खंडेराव टेकडीमार्गे बार्न स्कूलरोडने साउथ एअरफोर्स रोडवर दुचाकी थांबवून जंगलाकडे येण्यास सांगितले़ या मुलीने मम्मीकडे जायचे असल्याचे सांगत जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली़ मुलीच्या ओरडण्याचा आवाज गुरे चरणाºया गुराख्याने ऐकला व धावत त्याने मुलीची सुटका करून दुचाकीची चावी काढून घेत संशयित घोलप यास चोप देण्यास सुरुवात केली़