उच्चांकी तपमानाने उन्हाची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:29 PM2018-04-29T22:29:24+5:302018-04-29T22:29:24+5:30

सिन्नर : तालुक्याच्या तपमानाने यंदा उन्हाळ्यात प्रथमच उच्चांक गाठला. शहरापेक्षा ग्रामीण भागात तपमानाने मोठी उसळी घेतली. शहरात ४० अंश सेल्सिअसच्या आसपास, तर ग्रामीण भागात त्यापेक्षा जास्त तपमानाची नोंद झाली. तपमानातील वाढीमुळे सिन्नरकरांच्या अंगाची काहिली काहिली होत असल्याचे चित्र आहे.

High temperature increases the intensity of heat | उच्चांकी तपमानाने उन्हाची तीव्रता वाढली

उच्चांकी तपमानाने उन्हाची तीव्रता वाढली

Next
ठळक मुद्दे दुपारी ही दाहकता खूपच असल्याने रहदारी कमी होते.कडक उन्हाळामुळे मोठ्या सावलीचा शोध घ्यावा लागतो

सिन्नर : तालुक्याच्या तपमानाने यंदा उन्हाळ्यात प्रथमच उच्चांक गाठला. शहरापेक्षा ग्रामीण भागात तपमानाने मोठी उसळी घेतली. शहरात ४० अंश सेल्सिअसच्या आसपास, तर ग्रामीण भागात त्यापेक्षा जास्त तपमानाची नोंद झाली. तपमानातील वाढीमुळे सिन्नरकरांच्या अंगाची काहिली काहिली होत असल्याचे चित्र आहे.
रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाºयांच्या प्रमाणातही घट होत आहे. दुचाकी चालविणारे सनकोट, टोप्या, हातमोजे घालून फिरत आहेत. रस्त्याच्या कडेला थंड पेय, सरबते पिण्यासाठी आणि टरबुजाच्या गार गार फोडी खाण्यासाठी हातगाड्यांवर गर्दी पाहायला मिळत आहे. तपमानात वाढ झाल्याने रात्रीच्या वेळीही नागरिकांना गरम होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर छतावर गरगरणारे पंखे गरम हवा फेकत असल्याने ग्रामीण भागात नागरिकांना घराबाहेर झोपण्याची वेळ आली आहे.
भारनियमनामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या त्रासात आणखीनच भर पडत आहे. शेतकरी लवकर शेतात जाऊन दुपारपर्यंत कामे उरकून सावलीचा आधार घेतात, तर जनावरे चारणाºया गुराख्यांना कडक उन्हाळामुळे मोठ्या सावलीचा शोध घ्यावा लागतो. महत्त्वाच्या कामांसाठी ग्रामीण भागातून शहरात येणाºया ग्रामस्थांना मात्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तपमानामुळे विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत असून, त्यामुळे अनेक आजार बळावल्याचे दिसून येते. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसत आहे.तपमानाचा पारा चढलावैशाख महिना सुरू झाल्यापासून दिवसेंदिवस तपमानात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत तालुक्यातील तपमानाचा पारा चढल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. सकाळी शहर व ग्रामीण भागात दिसणारी गर्दी दुपारी १२ वाजेनंतर कमी होते. उन्हाच्या दाहकतेमध्ये अचानक वाढ झाल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. दुपारी ही दाहकता खूपच असल्याने रहदारी कमी होते.

Web Title: High temperature increases the intensity of heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.