कमाल तापमान घसरले : नाशिककर करताहेत वातावरणातील गारव्याचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 05:17 PM2019-12-17T17:17:53+5:302019-12-17T17:19:25+5:30

नाशिककरांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. दूधविक्रेते, पेपरविके्रते, शालेय मुलांची वाहतूक करणारे वाहनचालक तसेच विद्यार्थी थंडीपासून बचाव करताना दिसून येत आहे.

High Temperatures Fall: Nashik: Environmental havoc faced by Nashik | कमाल तापमान घसरले : नाशिककर करताहेत वातावरणातील गारव्याचा सामना

कमाल तापमान घसरले : नाशिककर करताहेत वातावरणातील गारव्याचा सामना

Next
ठळक मुद्देनाशिककरांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला मंगळवारी किमान तापमान १६.२ अंश

नाशिक : थंडीचा कडाका शहरात वाढू लागला आहे. किमान तापमानाचा पारा १२ अंशांवरून जरी पुढे सरकत असला तरीदेखील थंडीचा कडाका अद्यापही फारसा कमी झालेला नाही. वातावरणात गारवा कायम असून, वाऱ्याचा वेगदेखील दोन दिवसांपासून वाढला आहे. यामुळे नाशिककरांना सकाळ-संध्याकाळ हुडहुडी जाणवत आहे. मंगळवारी (दि.१७) किमान तापमान १६.२ अंश इतके नोंदविले गेले. वातावरणात गारवा जाणवू लागल्याने नाशिककरांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मागील चार ते पाच दिवसांपासून शहराच्या किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत होता. रविवारपासून किमान तापमानात ढगाळ हवामानामुळे वाढ होऊ लागली. गेल्या शुक्रवारी शहराचा पारा १२ अंशांपर्यंत खाली घसरला होता. त्यामुळे नाशिककर चांगलेच गारठले होते. त्या तुलनेत थंडीचा जोर कमी झाला. शुक्रवार व शनिवार रोजी राज्यात नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली होती. मंगळवारी राज्यात सर्वाधिक कमी तापमान १३.६ अंश इतके महाबळेश्वरमध्ये नोंदविले गेले. निफाडच्या हवामान केंद्रात या हंगामातील नीचांकी १२.१ अंश इतके तापमान सोमवारी नोंदविले गेले होते.

पहाटे धुक्याची चादर
शहरात पहाटे धुके पडत असून, शहराने जणू धुक्याची चादर पांघरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शनिवारी संपूर्ण शहर दाट धुक्यात सकाळी उशिरापर्यंत हरविलेले होते. यानंतर मंगळवारीदेखील पहाटे काही वेळ शहराच्या विहितगाव, टाकळी, इंदिरानगर, मखमलाबाद, म्हसरूळ भागात धुके पहावयास मिळाले.

उबदार कपड्यांचा वापर
नाशिककरांनी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे. दूधविक्रेते, पेपरविके्रते, शालेय मुलांची वाहतूक करणारे वाहनचालक तसेच विद्यार्थी थंडीपासून बचाव करताना दिसून येत आहे. किमान तापमानाचा पारा काही अंशी वाढला असला तरीदेखील पहाटे व रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे. मंगळवारीदेखील सकाळी व दुपारी अधूनमधून ढग दाटून येत होते. गुरुवारी रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत नाशिककरांनी कडाक्याची थंडी अनुभवली. त्यानंतर पुन्हा किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे.
 

Web Title: High Temperatures Fall: Nashik: Environmental havoc faced by Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.