कमी खर्चात मिळते अधिक उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:11 AM2019-05-28T00:11:07+5:302019-05-28T00:11:34+5:30
कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या सिडको अश्विननगर येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात गेल्या काही वर्षांपासून जलतरणपटूंची संख्या वाढली असल्याने तलावात पोहणे मुश्कील होत असल्याची खंत जलतरणपटूंकडून करण्यात येत आहे.
सिडको : कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या सिडको अश्विननगर येथील स्वामी विवेकानंद जलतरण तलावात गेल्या काही वर्षांपासून जलतरणपटूंची संख्या वाढली असल्याने तलावात पोहणे मुश्कील होत असल्याची खंत जलतरणपटूंकडून करण्यात येत आहे. या तलावालगत असलेल्या मोकळ्या जागेवर अधिक मोठ्या आकाराचा तलाव उभारण्याची मागणी केली जात आहे.
कामगारवस्ती असलेल्या सिडको भागात शिवसेना नगरसेवक मामा ठाकरे यांच्या संकल्पनेतून व महापालिकेच्या निधीतून गेल्या पंधरा वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद जलतरण तलाव उभारला आहे. या तलावात पोहणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. पंधरा वर्षांपूर्वीची सिडकोची लोकसंख्या व आजची लोकसंख्या यात दुपट्टीने वाढ झाली असल्याने या तलावात पोहणाºयांची गर्दी होत आहे. गेल्या रविवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास एक तरुण तलावात पोहत असताना पाण्यात खोलवर बुडत जात असल्याचे जीवरक्षक वाळू नवले व संजय पाटील यांच्या लक्षात आल्याने त्या तरुणास वाचविण्यात दोघा जीवरक्षकांनी वाचविले. परंतु असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी मनपानेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. तलावालगतच मनपाची मोकळी जागा असून, याठिकाणी मोठ्या आकाराचा तलाव उभारणे गरजेचे आहे. यामुळे सध्या असलेल्या तलावाचा वापर हा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ठेवत नवीन जागेत जलतरणपटूंसाठी पोहण्याची व्यवस्था करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जीवरक्षक म्हणून काम करीत आहे. या काळात हाउस म्हणून पोहण्यासाठी येणारे, पाण्यात बुडण्याचे प्रकार कायम घडत असतात. तलावात पोहणाºयांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून, तलावात प्रचंड गर्दी असल्याने नवीन पोहणारे पाण्यात बडू नये यासाठी बारीक लक्ष द्यावे लागते. तलाव हा लहान पडत असून, यासाठी मनपाने पर्याय खुला करण्याची गरज आहे.
- वाळू नवले, जीवरक्षक,
स्वामी विवेकानंद जलतरण तलाव गेल्या पंधरावर्षांपूर्वी कमी खर्चात उभारलेल्या या तलावात पोहणाºयांची संख्या वाढली आहे. कामगार वसाहत असलेल्या सिडको भागात लहान मुलांसह जलतरणपटूंची राष्टय स्तरावर निवड होण्यासाठी मनपाने तलावालगत असलेल्या मोकळ्या जागेवर दुसरा तलाव उभारणे गरजेचे आहे.
- मामा ठाकरे, माजी नगरसेवक , गर्दीमुळे अनेक अडचणी निर्माण
तलावात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच युवक व महिलांचीदेखील पोहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, यामुळे अडचणी निर्माण होत आहे. यातच सध्या लहान मुलांसाठी उन्हाळी शिबिर सुरू असल्याने शिकण्यासाठी येणाºया मुलांना अधिक वेळ देता येत नाही. तसेच तलावात अधिक गर्दी होत असल्याने एखादा मुलगा अथवा तरुण हा पाण्यात बुडत असल्यास त्याकडे लक्ष देणे कठीण होत आहे.