आतापर्यंतचे उच्चांकी ३८ बळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:24+5:302021-04-13T04:14:24+5:30

नाशिक : कोरोनाच्या भयानक उद्रेकासह बळींच्या वाढत जाणाऱ्या आकड्याने सोमवारी (दि. १२) आतापर्यंतच्या एकाच दिवसातील बळींचा उच्चांक गाठला आहे. ...

Highest 38 victims so far! | आतापर्यंतचे उच्चांकी ३८ बळी !

आतापर्यंतचे उच्चांकी ३८ बळी !

Next

नाशिक : कोरोनाच्या भयानक उद्रेकासह बळींच्या वाढत जाणाऱ्या आकड्याने सोमवारी (दि. १२) आतापर्यंतच्या एकाच दिवसातील बळींचा उच्चांक गाठला आहे. सोमवारी तब्बल ३८ बळींची नोंद झाली असून, सातत्याने आठवडाभरापासून बळींची संख्या तीसहून अधिक राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या सत्ताविसशेचा आकडा ओलांडून २७२०वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात सोमवारी बाधित संख्येत ३५८८ने वाढ झाली असून, एकूण ३,९२८ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १८८७, तर नाशिक ग्रामीणला १५६८ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ९५ व जिल्हाबाह्य ३८ रुग्ण बाधित आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १३, ग्रामीणला २२, तर मालेगावला दोन आणि जिल्हाबाह्य एक असा एकूण ३८ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणेसमोरदेखील बळी रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गत पंधरवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने तीन हजार आणि चार हजारांवर राहिल्यानंतर पुन्हा बळींच्या संख्येने नवीन उच्चांक गाठल्याने सर्व यंत्रणाच हतबल झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्यादेखील सर्वाधिक स्तरावर असून, सध्या ३६ हजार ६४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रात २० हजार ९९३, नाशिक ग्रामीणला १३ हजार ४७०, मालेगाव मनपाला १७८५, तर जिल्हाबाह्य ३९४ रुग्णांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कठोर निर्बंधांपेक्षाही कठोर उपाययोजना अत्यावश्यक असल्याची चर्चा आहे.

इन्फो

ग्रामीणचे बळी पुन्हा शहरापेक्षा अधिक

जिल्ह्यातील ३८ बळींपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे २२ बळी हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोंदले गेले आहेत. हे बळी शहरातील बळींपेक्षा सातत्याने अधिक येऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातदेखील बळींचे तांडव सुरू झाल्याने आरोग्य विभागाला आता ग्रामीण भागावर पुन्हा अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

इन्फो

प्रलंबित अद्यापही दहा हजारांवर

जिल्ह्यात अहवाल प्रलंबित राहण्याचे प्रमाण सतत दुसऱ्या दिवशी दहा हजारांवर राहिले आहे. नमुन्यांच्या वाढत्या संख्येने अहवाल कितीही मिळाले तरी प्रलंबितची संख्या उच्चांकी स्थानावर आहे. सोमवारी ही संख्या दहा हजार १४८वर पोहोचली असून, त्यामुळे या पूर्ण आठवड्यात बाधित संख्येत वाढ कायमच राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: Highest 38 victims so far!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.