जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक ४०९९ रुग्ण; नऊ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 01:35 AM2021-03-27T01:35:43+5:302021-03-27T01:36:04+5:30

नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंख्येने जिल्ह्यात प्रथमच ४ हजारांचा तर शहरात २ हजारांचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे ४०९९ रुग्ण बाधित आढळले असून नाशिक शहरातही २०९० रुग्ण बाधित आढळले आहेत.

The highest number of corona in the district is 4099 patients; Nine victims | जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक ४०९९ रुग्ण; नऊ बळी

जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक ४०९९ रुग्ण; नऊ बळी

Next

नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंख्येने जिल्ह्यात प्रथमच ४ हजारांचा तर शहरात २ हजारांचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे ४०९९ रुग्ण बाधित आढळले असून नाशिक शहरातही २०९० रुग्ण बाधित आढळले आहेत. तर जिल्ह्यात ९ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२८३ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २६) ४०९९ बाधित रुग्ण तर २१५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दऱम्यान नाशिक मनपा क्षेत्रात ४, ग्रामीणला ४ तर जिल्हा बाह्य १ असे एकूण ९ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२८३ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून तर कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने दोन हजारांवर राहिल्यानंतर बुधवारी तीन हजार पार तर गुरुवारी तीन हजारांनजीक होती.
शुक्रवारी बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित निघत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेलादेखील चिंता लागून आहे.गतवर्षीपर्यंत कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या ही २०४८ होती. म्हणजेच गतवर्षातील सप्टेंबर महिन्याच्या उच्चांकी संख्येच्या दुप्पट कोरोना रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत.
नाशिक मनपा क्षेत्रात प्रथमच २ हजारपार
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारच्या एकाच दिवसभरात आतापर्यंतचे सर्वाधिक २०९० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. महानगरातदेखील सातत्याने हजार, बाराशेपेक्षा अधिक रुग्ण एकाच दिवशी सापडण्याचा प्रकार प्रथमच घडून येत आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
प्रलंबित साडेपाच हजार
दिवसाला तीन-चार हजारांचे अहवाल बाधित तर तितकेच अहवाल निगेटीव्ह येत असूनही प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा साडेपाच हजारांहून अधिक म्हणजे ५५१७ वर पोहोचली आहे. त्यामुळे आठवडाअखेरपर्यंत बाधितांची संख्या कायम राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, ही वाढ अशीच कायम राहिल्यास प्रशासनाला पुढील महिन्यात विविध पर्यायाचा अवलंब करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: The highest number of corona in the district is 4099 patients; Nine victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.