येवला तालुक्यात मुलींचे प्रमाण सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:15 AM2017-09-21T00:15:21+5:302017-09-21T00:17:03+5:30

सिन्नर पिछाडीवर : गर्भलिंग चिकित्सेवर कारवाई नाशिक : मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने गर्भलिंग चिकित्सेवर बंदी घातल्याचा परिणाम पाहता जिल्ह्णातील येवला तालुक्यात यंदा मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या कमालिची वाढली आहे. प्रति हजारी मुलांमागे येवल्यात मुलींची संख्या ९९१ इतकी झाली असून, त्यामानाने सर्वाधिक कमी संख्या सिन्नर तालुक्यात ८९३ इतकी असल्याचे उघडकीस आले आहे.

The highest number of girls in Yeola taluka | येवला तालुक्यात मुलींचे प्रमाण सर्वाधिक

येवला तालुक्यात मुलींचे प्रमाण सर्वाधिक

Next

सिन्नर पिछाडीवर : गर्भलिंग चिकित्सेवर कारवाई

नाशिक : मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने गर्भलिंग चिकित्सेवर बंदी घातल्याचा परिणाम पाहता जिल्ह्णातील येवला तालुक्यात यंदा मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या कमालिची वाढली आहे. प्रति हजारी मुलांमागे येवल्यात मुलींची संख्या ९९१ इतकी झाली असून, त्यामानाने सर्वाधिक कमी संख्या सिन्नर तालुक्यात ८९३ इतकी असल्याचे उघडकीस आले आहे.
जिल्हा गर्भधारणा व प्रसवपूर्व निदानतंत्र अधिनियम अंतर्गत समितीची बैठक जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी विविध तालुक्यांतील मुला-मुलींचे प्रमाण, सोनोग्राफी केंद्रावरील कारवाई, इंद्रधनुष्य अभियान, जिल्हा एड्स नियंत्रण समिती आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्णातील सिन्नरसह काही तालुक्यांतील मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी आहे. महानगरपालिका हद्दीत तसेच जिल्ह्णाच्या काही ठिकाणी सोनोग्राफी तंत्राचा वापर करून गर्भलिंग तपासणीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी महापालिका, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करावी.
दोषी प्रकरणांमध्ये लगेचच कायदेशीर कारवाई केल्यास या प्रकरणांना आळा घालणे शक्य होईल, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाक्चौरे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. संवेदनशीलता बाळगून उपाययोजना कराआमची मुलगी व हेल्पलाइनच्या माध्यमातून येणाºया तक्रारींवर कार्यवाही करताना संवेदनशीलता बाळगून उपाययोजना कराव्यात. यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीत जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाºयांनी व जिल्ह्णाच्या ग्रामीण भागात महापालिकेच्या अधिकाºयांनी कारवाई करावी.

Web Title: The highest number of girls in Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.