लाल कांद्याची उच्चांकी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 03:19 PM2019-01-08T15:19:02+5:302019-01-08T15:19:11+5:30
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाच दिवशी लाल कांद्याची दोन हजार तर उन्हाळी कांद्याची पाचशे वाहने कांदा विक्र ीसाठी दाखल झाले होते.
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाच दिवशी लाल कांद्याची दोन हजार तर उन्हाळी कांद्याची पाचशे वाहने कांदा विक्र ीसाठी दाखल झाले होते. या वाहनांमधुन सुमारे ३० हजार क्विंटल तर उन्हाळी कांद्याची दहा हजार क्विंटल आवक झाली असुन चालु हंगामातील ही सर्वोच्च आवक झाली आहे. शिवाय प्रचंड आवक असुनही सायंकाळी उशिरापर्यंत एकोणीसशे वाहनांचा लिलाव पुर्ण करण्यात आला. तर उन्हाळी कांद्याचे पाचशे वाहनांचा लिलाव काल (दि.८) मंगळवार रोजी सकाळच्या सत्रात पुर्ण करण्यात आला. रोखीचा अर्थव्यवहार व उत्तम दर्जाचा बाजारभाव आदी कारणांमुळे नावलौकिक असलेल्या उमराणे बाजार समितीत शंभरहुन अधिक कांदा खरेदीदार व्यापारी व इलेक्ट्रॉनिक भुईकाटे असल्याने कसमादे परिसरासह धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांनी कांदा शेतमाल विक्र ीसाठी पसंती दिली आहे.त्यामुळे येथे नेहमीच कांदा आवक मोठ्या प्रमाणात होत असते. त्या अनुषंगाने सोमवारी मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने चालू हंगामातील ही सर्वोच्च आवक ठरली आहे. प्रचंड आवक असल्याने लाल कांद्याचे लिलाव पुर्ण होतात की नाही याबाबत शंका होती.परंतु येथील व्यापाऱ्यांनी एकाच दिवसात तब्बल एकोणीसशे वाहनांचा लिलाव पुर्ण केला. आवक वाढुनही लाल कांद्याचे बाजारभाव ८८० रु पयांपर्यंत होते. @ आवक वाढल्याने गावातील सर्वच रस्त्यांवर वाहनांची वर्दळ दिसून येत होती. एका दिवसातच दिड ते दोन कोटी रु पयांची उलाढाल झाली. छोट्या मोठ्या व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले. मजुरांना मोठ्या प्रमाणात कामधंदा मिळाला. वाहनांच्या वर्दळीमुळे बाजार समितीच्या आवारासह संपूर्ण गावात धुळीचे साम्राज पसरले आहे.