मानवी जीवनात माणुसकीला सर्वोच्च स्थान : शेळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:04 AM2018-05-01T01:04:33+5:302018-05-01T01:04:33+5:30
विज्ञान वा तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या माणुसकीचे स्थान हे मानवाच्या जीवनात नेहमीच सर्वोच्च असेल, असे प्रतिपादन कवी व व्याख्याते राज शेळके यांनी केले़ माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प ‘किस्से माणसाचे’ या विषयावर गुंफतांना शेळके बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते़
सिडको : विज्ञान वा तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या माणुसकीचे स्थान हे मानवाच्या जीवनात नेहमीच सर्वोच्च असेल, असे प्रतिपादन कवी व व्याख्याते राज शेळके यांनी केले़ माय मराठी मोफत ग्रंथघर, सूर्योदय परिवार आणि नवीन नाशिक ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माय मराठी सिडको वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प ‘किस्से माणसाचे’ या विषयावर गुंफतांना शेळके बोलत होते़ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल उपस्थित होते़ प्रा. शेळके यांनी प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यातील प्रसंग व अनुभवांचे दाखले देत त्यांच्यावर घरातूनच झालेले माणुसकीचे संस्कार त्यांना उंचीपर्यंत घेऊन गेल्याचे सांगितले़ माणसाची ओळख ही माणुसकीमुळेच होत असली तरी सद्यस्थितीत अल्पकालावधीत अती मिळविण्याच्या हव्यासापोटी माणुसकीचा हा झरा आटत चालला असल्याचे शेळके म्हणाले़ प्रारंभी वक्त्यांचा परिचय नंदकुमार दुसानिस यांनी करून दिला़ यावेळी अरविंद वाडिले, कृष्णराव बेधडे, विनय गुंजाळ, रमेश सोनवणे, व्ही. के. पवार, श्रीकांत सोनार, सुखदेव भामरे, देवीदास निकम, बाळकृष्ण गोळे उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष किरण सोनार यांनी केल़े प्रास्ताविक देवराम सौंदाणे यांनी केले. प्रकाश काळे यांनी आभार मानले.
भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची गरज
कालौघात समाजात विभक्त कुटुंबपद्धती आकारास आली असून, कुटुंबातील संवादही दिवसेंदिवस हरपत चालला आहे़ फेसबुक, व्हॉट्स अॅप यांसारख्या सोशल मीडियाची संवादासाठी आपल्याला गरज भासू लागली हेच माणूस माणसापासून दूर गेल्याचे चिन्ह आहे़ असंवेदनशीलता, असहिष्णुता यांबरोबरच कायिक व वाचिक हिंसेचे प्रमाणही वाढत चालले आहे़, ते पाहता संपूर्ण जगाला तथागत गौतम बुद्ध व भगवान महावीर यांच्या अहिंसा तत्त्वाची गरज असल्याचे ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी यावेळी सांगितले़