मक्याला सर्वोच्च भाव, १७७९ रुपये क्विंटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 02:07 PM2019-01-09T14:07:17+5:302019-01-09T14:08:24+5:30
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत मका (भुसार ) मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.परिणामी ...
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत मका (भुसार ) मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.परिणामी मका मालाच्या बाजारभावात वाढ होत सर्वोच्च १७७९ रु पये भाव मिळाला आहे. चालू हंगामातील हा सर्वोच्च भाव आहे. येथील बाजार समितीत कांद्याबरोबरच भुसार (मका,गहु,बाजरीच्या,तुर) आदी शेतमाल खरेदी विक्र ीची मोठी बाजारपेठ असल्याने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात मका मालाची आवक होते. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कसमादे पट्ट्यासह इतरत्र पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने मका पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाली होती. शिवाय कमीअधिक प्रमाणात ज्या पेरण्या झाल्या त्यांनाही पुरेशे पाणी न मिळाल्याने मका उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.परिणामी चालुवर्षी सुरु वातीपासूनच मक्याला १२०० ते १४०० रु पये क्विंटल असा भाव होता.मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बाजारभाव चांगले असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी लगेचच बाजारात मका माल विकला. त्यामुळे सद्यस्थितीत बाजारात मोठ्या प्रमाणात आवक घटल्याचे चित्र आहे. यास्तव बाजारात होणारी आवक व मागणीचे प्रमाण व्यस्त झाल्याने बाजारभावात मागील सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात सरासरी व सर्वोच्च दरात १५० रु पयांची वाढ झाली आहे. बुधवार (दि.९) येथील बाजारात सकाळच्या सत्रात मका मालाला कमीतकमी १७०० रु पये, जास्तीतजास्त १७७९ रु पये तर सरासरी १७४० रु पये प्रतीक्विंटल असा भाव मिळाला. सुमारे १०० वाहनांमधुन २८०० क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे.