महामार्गावरील दुभाजक बनले भकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:19 AM2018-06-18T00:19:25+5:302018-06-18T00:19:25+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नल दरम्यानच्या रस्ता दुभाजकांमध्ये शोभिवंत फुलांची झाडे लावण्याऐवजी चक्क गवताच्या पेंढ्याच लावण्यात आल्या होत्या. या गवताच्या पेंढ्या सुकून गेल्याने रस्ता दुभाजक सुशोभित होण्याऐवजी भकास झाल्याचे दिसत आहे.
उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नल दरम्यानच्या रस्ता दुभाजकांमध्ये शोभिवंत फुलांची झाडे लावण्याऐवजी चक्क गवताच्या पेंढ्याच लावण्यात आल्या होत्या. या गवताच्या पेंढ्या सुकून गेल्याने रस्ता दुभाजक सुशोभित होण्याऐवजी भकास झाल्याचे दिसत आहे. शहरात मनपा प्रशासनाकडून रस्ता दुभाजकामध्ये शोभिवंत झाडे लावली जात असल्याने परिसराच्या शोभेमध्ये वाढ होत आहे. तसेच दुभाजकांमधील झाडांमुळे सायंकाळनंतर पलीकडच्या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनाच्या लाईटचा प्रकाश पडत नसल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडांची रोपे लावण्याऐवजी चक्क गवताच्या पेंढ्या लावण्यात आल्या होत्या. उन्हाच्या चटक्यामुळे सदर गवताच्या पेंढ्या वाळून गेल्याने रस्ता दुभाजक स्मार्ट होण्याऐवजी भकास झाल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक शहराचे पुणे बाजूकडील प्रवेशद्वार असलेल्या नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर सिग्नल ते नासर्डी पुलापर्यंत मनपा प्रशासनाने पावसाळा ऋतूच्या आगमनाची संधी शोधून शोभिवंत झाडे लावल्यास महामार्ग व शहराच्या सौंदर्यात भर पडेल.रस्ता दुभाजकामध्ये अनेक ठिकाणी पिंपळाची झाडे उगवली असून, ती बºया प्रमाणात मोठी झाली आहेत. या पिंपळाच्या झाडांकडे वेळीच लक्ष न दिल्यास भविष्यात ती मोठी झाल्यानंतर वाहतुकीच्या दृष्टीने धोक्याची ठरण्याची शक्यता आहे. अगोदरच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतुकीला अडथळा ठरणारी झाडे न्यायालयाच्या निर्णयामुळे तोडणे अवघड होऊन बसले आहे.