मुंबई नाका ते स्वामीनारायण मंदिरापर्यंत महामार्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:24 PM2020-08-31T23:24:08+5:302020-09-01T01:16:36+5:30
नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग आठवडाभरापासून बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे समांतर रस्त्यांवर दुतर्फा वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे आण िउड्डाणपुलावरून गळक्या पाईपलाईन मधून सांडणार्या पावसाच्या पाण्याने महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले होते. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत होते.

मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबई नाक्यापासून तर थेट स्वामीनारायण मंदिरापर्यंत ठिकाणी चिखल पसरल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मुंबईनाका द्वारका वडाळानाका, टाकळीफाटा, जुना आडगाव नाका, आधी चौफुल्यावर बॅरिकेड लावून महामार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्याने पुढे मार्गस्थ होऊ लागल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. मागील सोमवारपासून हा रस्ता बंद करण्यात आलेला असून अिग्नशमन दलाच्या मदतीने तसेच प्राधिकरणाकडून ठिकठिकाणी चिखल काढून रस्ता सुरिक्षत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. द्वारका ते मुंबईनाका रस्ता खुला करण्यास सध्या तरी काहीही हरकत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे कारण त्या रस्त्यांवर कुठेही आता चिखलाचे साम्राज्य दिसून येत नाही.त्यामुळे येथून सुरिक्षतपणे वाहने मार्गस्थ होऊ शकतात असे नागरिकांचे म्हणणे आहे दरम्यान शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी तातडीने या भागाची पाहणी करून स्वच्छतेचे काम मार्गी लागणे आदेश द्यावेत आण िवाहतूक सुरळीत करण्यास हातभार लावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सोमवारी(दि.31) पावसाने उघडीप दिली तसेच दुपारनंतर अधूनमधून सूर्यदर्शनही घडल्याने चिखल कोरडा होण्यास मदत झाली. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने मुंबईनाका ते स्वामी नारायण मंदिरापर्यंतचा महामार्ग सुरिक्षत करु न तो वाहनांसाठी खुला करु न देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.