महामार्ग सत्तरा वरील दुरवस्था पेवासला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 07:16 PM2019-11-20T19:16:57+5:302019-11-20T19:18:09+5:30
खामखेडा : नामपुर-सटाणा-पिंपळदर-खामखेडा -कळवण-नाशिक हा राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील पिंपळदर ते मागबारी घाट खामखेडा ते बेज या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता उखडलेला आहे. तसेच काटेरी बाभुळ मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत पसरल्याने या भागातून वाहन चालविणे अवघड झाले आहे. सदर त्रासदायक बाभळाची झाडे काढून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी आशी मागणी परिसरातील नागरिकानी केली आहे.
खामखेडा : नामपुर-सटाणा-पिंपळदर-खामखेडा -कळवण-नाशिक हा राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील पिंपळदर ते मागबारी घाट खामखेडा ते बेज या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता उखडलेला आहे. तसेच काटेरी बाभुळ मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत पसरल्याने या भागातून वाहन चालविणे अवघड झाले आहे. सदर त्रासदायक बाभळाची झाडे काढून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी आशी मागणी परिसरातील नागरिकानी केली आहे.
कळवण-सटाणा हा राज्य माहामार्ग क्र मांक १७ नाशिकला व नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळचा असल्याने या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. दर वर्षी या रस्त्याचे डागडुजी करण्यात येते. ही डागाडुजी करताना फक्त मोठे खडे बुजण्यात येतात. लहान खड्डे तसेच असतात. तेव्हा पावसाळ्यात या लहान खड्यात पावसाचे पाणी साचून ही लहान खड्डे पुन्हा मोठे होतात.
आता झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी साचल्याने सदर खड्डे मोठ्या प्रमाणात खोल झालेले आहेत. तसेच सटाणा पिंपळदर - खामखेडा -पिळकोस - बेज - कळवण या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी बाभळी वाढल्या असल्याने वळण रस्त्यावरील समोरून येणार वाहन दिसत नसल्याने नेहमी अपघात होतात.
हा रस्ता नाशिक व नांदुरी गडावर जाण्यासाठी जवळचा असल्याने साक्र ी, नंदूरबार, नावापुर आदि भागातील भाविक या रस्त्यावरु न नांदुरी गडावर जातात. या घाटातून वाहने चालविताना वाहन धारकाला कसरत करावे लागते. अनेक वेळा हे घाटातून प्रवास करताना रस्त्यातील खड्डे टाळण्याच्या नादात नेहमी लहान-मोठ्या स्वरूपाचे अपघात होतात.
सदर रस्ता तयार करताना पिंपळदर गावाजवळ लाखो रु पये खर्चून दोन्ही बाजूला सीमेन्टच्या गटारी तयार करण्यात आल्या होत्या. परंतु देखभाली अभावी त्या गटारीत कचरा आणि माती जाऊन पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी पिंपळदर गावाजवळू डांबरी रस्त्यावरून वाहते. तेव्हा पिंपळदर गावाजवळ डांबरी रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले असून या ठिकाणी डांबरी रस्ता नाही असे चित्र दिसत आहे.
या रस्त्यावरील साइड पट्या अनेक ठिकाणी रस्त्यापेक्षा खोल झाल्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेच्या शेतकर्यांनी रस्त्यावर अतिक्र मण केल्याने रस्त्याच्या कडेच्या गटारी ज़मीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे रस्ता अरु ंद होऊ लागला आहे.
या महामार्गावरील अनेक ठिकाणी सुचनादर्शक, दिशादर्शक व आंतरदर्शक फलकाची अत्यंत दुरावस्था झाली आहेत. या वळण रस्त्यावरील समोरून येणारे वाहन अचानक दिसते, त्यामुळे दोन्ही वाहंचालकामघ्ये गोंधळ होऊन अपधात होतो. तेव्हा सदर रस्त्यावरील खडे बुजवण्यात येऊन, दिशादर्शक, सुचनादर्शक व अंतरदर्शक फलक व्यविस्थत करण्यात यावेत आशी मागणी प्ािंपळदर, सटाणा, खामखेडा, पिळकोस बेज, परिसरातील नागरिक व यात्रेकरु याच्या कडून करण्यात येत आहे.