महामार्ग वाहतुक पोलिस अत्याधुनिक यंत्रनेने सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 06:54 PM2019-11-12T18:54:52+5:302019-11-12T18:56:34+5:30
ओझर : पिंपळगाव-ओझर वाहतूक पोलीस महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी यांना अप्पर पोलिस महासंचालक, वाहतुक विभाग, मुंबई यांच्या वतीने पुरविण्यात आलेल्या नविन इंर्टींगा वाहन व त्यामध्ये बसविलेल्या अत्याधुनिक उपकरणाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन एम. एस. एक्सपेरिओ प्रा. लि. दिल्ली यांच्या वतीने राकेश यादव यांनी ओझर पिंपळगाव महामार्गावरील पोलिस केंद्रावर उपस्थित अधिकारी व कर्मचारी याना देण्यात आले.

या वाहनांतील अत्याधुनिक उपकरणामध्ये वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कारवाई करिता स्पीडगन लेझर कॅमेरा डिव्हाईस बसविण्यात आलेला आहे. वाहनाच्या काचांच्या काळ्या फिल्म् लावल्यास त्यांचेवर कडक कारवाई करण्यासाठी टींन्ट मीटर मशीन बसविण्यात आलेले असून मद्यप्राशन करून वाहन चालविल्यास चालकांवर ब्रेथ आॅनलायझर मशीनद्वारे दंड आकारण्यात येईल. तसेच विना हेल्मेट धारक, विना सेन्टी बेल्ट धारकावरही करडी नजर ठेवली जाणार आहे. सदरचे अत्याधुनिक वाहने हे राष्ट्रीय महामार्ग ३ (मुंबई आग्रा महामार्ग) व इतर राज्य महामार्गावर २४ तास सतत गस्त घालणार असून वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांचेवर आपोआप मशीनद्वारे आॅनलाईन पद्धतीने चलन बनवून दंडाची रक्कम विना विलंब वसूल केली जाईल.
महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगाव ओझर येथील महामार्गावर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करत असताना आता त्यांच्या दिमतीला नव्याने अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज वाहने उपलब्ध झाल्याने वाहन चालकांवर कडक कारवाई होणार आहे.
वाहतूक नियमानुसार गाड्यांच्या काचांना फिल्म्स लावल्यास त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आलेली असताना अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्यांच्या गडद काळ्या फिल्म असून त्यावर नेमका कुणाचा अंकुश आहे असा सवाल सामान्य चारचाकी वाहन धारकांना पडला आहे. बहुतेक पोलीस अधिकाºयांच्या गाड्यांना देखील काळ्या फिल्म लावलेल्या आढळून येतात कायदा सर्वांना सारखा असताना त्यांच्या वर दंडात्मक का केली जात नाही असा प्रश्न सामान्य वाहन चालकांना पडला आहे.