महामार्गावरील वाहतूक मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:26+5:302021-05-21T04:16:26+5:30

वीजपुरवठा सुरळीत झाल्याने दिलासा नाशिक : चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शहर परिसरातील अनेक भागात वीजपुरवठा विस्कळीत होता. आता वादळ निवळल्यामुळे राहिलेली ...

Highway traffic slowed | महामार्गावरील वाहतूक मंदावली

महामार्गावरील वाहतूक मंदावली

Next

वीजपुरवठा सुरळीत झाल्याने दिलासा

नाशिक : चक्रीवादळाच्या प्रभावामुळे शहर परिसरातील अनेक भागात वीजपुरवठा विस्कळीत होता. आता वादळ निवळल्यामुळे राहिलेली दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आल्याने शहरातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महावितरणचे तांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न करीत होते.

लेटरबॉक्स वीजबिलांनी भरगच्च

नाशिक : इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेले लेटरबॉक्स सध्या महावितरणच्या वीजबिलांनी भरले आहे. ग्राहकांना वीजबिले पाठविली जात असली तरी मागील वर्षापासून थकीत वीजबिलांमुळे वाढत जाणाऱ्या रकमेमुळे ग्राहक वीजबिल काढून घेत नसल्याने लेटरबॉक्स भरलेले आहे. वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये अजूनही संभ्रम असल्याने ग्राहकांची महावितरणविरोधातील नाराजी कायम असल्याचे दिसते.

फेरीवाल्यांकडून मास्ककडे दुर्लक्ष

नाशिक : केारोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. भाजीपाला विक्री करणाऱ्यांना फिरतीवर भाजीविक्री करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मात्र विक्रेत्यांकडून मास्क वापराकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. ग्राहकांशी बोलता येत नसल्याचे कारण सांगून ते मास्क हनुवटीवर ठेवतात. त्यामुळे कारोनाचा प्रसार रोखणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एटीएममधील सॅनिटायझर गायब

नाशिक : निर्बंधांच्या काळात एटीएमचा अधिक वापर होत असतानादेखील त्या ठिकाणी सॅनिटायझर ठेवले जात नसल्याचे दिसून येते. मागील वर्षी याबाबतची दक्षता घेण्यात आली होती. परंतु यंदा एटीएममध्ये सॅनिटाझर ठेवले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा ठिकाणी ग्राहकांना स्वत:लाच काळजी घ्यावी लागत आहे.

Web Title: Highway traffic slowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.