विकासकामांच्या शोधासाठी पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:29 PM2018-08-16T23:29:37+5:302018-08-16T23:30:09+5:30
आझादनगर : मनपा वॉर्ड क्रमांक २० मधील कागदोपत्री झालेली विकासकामे शोधण्यासाठी महागठबंधन आघाडीच्या वतीने माजी आमदार मोहंमद इस्माईल व गटनेता बुलंद एकबाल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता शहिदों की यादगार पासून ‘विकास की तलाश’ नावाने पदयात्रा काढण्यात आली.
आझादनगर : मनपा वॉर्ड क्रमांक २० मधील कागदोपत्री झालेली विकासकामे शोधण्यासाठी महागठबंधन आघाडीच्या वतीने माजी आमदार मोहंमद इस्माईल व गटनेता बुलंद एकबाल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता शहिदों की यादगार पासून ‘विकास की तलाश’ नावाने पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेला पोलिसांनी नंदन टॉवर येथे अडविल्याने पदयात्रेचे सभेत रूपांतर होऊन महागठबंधन आघाडीच्या नेत्यांची भाषणे झाली. यावेळी जनता दलाचे सचिव मुस्तकीन डिग्निटी, नगरसेवक एजाज बेग, अमानतुल्ला पीर मोहंमद उपस्थित होते. मनपाचा तत्कालीन प्रभाग क्रमांक ३२ तथा सध्याचा वॉर्ड क्रमांक २० मध्ये ९० लाख रुपयांचे एकूण ३७ विकासकामे कागदोपत्री दर्शवित मनपास कामाचे देयके सादर करून मोठी रक्कम हडपण्याचा संशय महागठबंधन आघाडीने व्यक्त केला आहे. झालेल्या विकासकामांची चौकशी करण्यात यावी.
कागदोपत्री झालेल्या कामांबाबत स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विकास की तलाश म्हणून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुफ्ती मोहंमद इस्माईल म्हणाले की, मनपात सत्तारुढ कॉँग्रेस पक्षातर्फे नगरसेवक निधीबाबत दुजाभाव करण्यात आला होता. माजीमंत्री निहाल अहमद यांच्या कृतीनुसार शहरातील ३७ चौकात प्रत्येकी तीन जणांचे धरणे आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला.
गठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद एकबाल म्हणाले की, महात्मा गांधीच्या दांडीयात्रेपासून प्रेरणा घेत भ्रष्टाचारविरोधात सनदशीर मार्गाने लढा देण्यासाठी १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
पदयात्रेत नगरसेवक मोहंमद आमीन मोहंमद फारुख, बाकी राशनवाला, हाजी मोहंमद हनीफ साबीर, मुस्लीम धांडे, अॅड. गिरीश बोरसे, डॉ. शफीक अहमद यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.