गुढीपाडवा यात्रोत्सवासाठी पदयात्रा

By Admin | Published: March 23, 2017 12:27 AM2017-03-23T00:27:05+5:302017-03-23T00:27:20+5:30

वावी : श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे गुढीपाडव्याला भरणाऱ्या कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी वावी (ता. सिन्नर) येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Hiking for the Gudi Padwa Yatra | गुढीपाडवा यात्रोत्सवासाठी पदयात्रा

गुढीपाडवा यात्रोत्सवासाठी पदयात्रा

googlenewsNext

वावी : श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे गुढीपाडव्याला भरणाऱ्या कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी वावी (ता. सिन्नर) येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी गुरुवारपासून (दि. २३) पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रोत्सवासाठी गुरुवारी वावीपासून नाथभक्तांचे पायी दिंडीद्वारे प्रस्थान होणार आहे.  वावी गावचे आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराज यांचा यात्रोत्सव श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमी व गुढीपाडव्याच्या दिवशी भरतो. रंगपंचमी व गुढीपाडवा अशा दोन्ही यात्रोत्सवासाठी दरवर्षी येथून पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. रंगपंचमीला झालेल्या यात्रेसाठी येथून नाथभक्त पायी दिंंडीने श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे गेले होते. आता गुढीपाडव्याला होणाऱ्या यात्रोत्सवासाठीही गुरुवार (दि. २३) ते मंगळवार (दि. २८) पर्यंतच्या या पदयात्रेची तयारी सुरू असून, यात्रोत्सवात सहभागी होणारा रथ सजविण्यात आला आहे. पदयात्रेसाठी युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे.  गुढीपाडवा यात्रोत्सवासाठी गेल्या नऊ वर्षांपासून पदयात्रेत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोणी, कोल्हार, सोनई, शनिशिंंगणापूर, टाकळीमियाँ, मिरी, तिसगाव यामार्गे जाणाऱ्या पदयात्रेत भक्त दररोज ४० किलोमीटर अंतर पायी चालतात. या पदयात्रेसोबत पिण्याच्या पाण्याचा टँकर, ट्रॅक्टर, टेम्पो आदि वाहने असतात.
बुधवार (दि. २२) रोजी येथील कानिफनाथ मंदिराच्या प्रांगणात रथ, ध्वज व पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी कानिफनाथ महाराज रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गुरुवारी (दि. २३) सायंकाळी दिंडीचे प्रस्थान होईल.
पदयात्रेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन पदयात्रा संयोजक कानिफनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Hiking for the Gudi Padwa Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.