शाळा, महाविद्यालयांत हिंदी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:46 PM2020-09-15T23:46:34+5:302020-09-16T01:01:24+5:30
मालेगाव : शहर परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये हिंदी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मालेगाव कॅम्प येथील मराठी अध्यापक विद्यालयात हिंदी दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित प्राचार्य व्ही. डी. सोनवणे, व्ही. व्ही. मगरे, डॉ. कविता पाटील, व्ही. डी. निकम आदींसह शिक्षकवृंद.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहर परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये हिंदी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दौलती इंटरनॅशनल
इंग्लिश मीडियम स्कूल
मालेगाव येथील दौलती इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल (सी.बी.एस.ई.) येथे राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवीदास बच्छाव होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे आॅनलाइन भाषणे झाली. शाळेचे प्राचार्य गणेश शिंदे, उपप्राचार्य केतन सूर्यवंशी, हिंदी शिक्षिका अर्चना कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रियंका जैन व गौरव शेलार या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्राची भगवाने या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमास कोषाध्यक्ष कमलताई बच्छाव, सचिव सचिन बच्छाव, उपाध्यक्ष पूनम बच्छाव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महिला महाविद्यालय
मालेगाव : येथील श्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. उज्ज्वला देवरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दीपक अहिरे होते. प्राचार्या डॉ. देवरे, प्रा. अहिरे, निशा प्रजापत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. अनिता नेरे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डॉ. योगीता घुमरे यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. डी. ए. पवार, डॉ. डी. जी. जाधव आदिंसह विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते.मराठी अध्यापक विद्यालयमालेगाव कॅम्प येथील मराठी अध्यापक विद्यालय संलग्न सराव पाठ शाळेत विश्व हिंदी दिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. डी. सोनवणे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य सोनवणे व व्ही. व्ही. मगरे यांनी हिंदी भाषेचे महत्व विशद केले. सूत्रसंचालन डॉ. कविता पाटील यांनी केले. आभार व्ही. डी. निकम यांनी मानले. कार्यक्र माला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.