विविध शाळांमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:46 PM2020-09-16T22:46:37+5:302020-09-17T01:23:52+5:30
नाशिक- भोसला मिलीटीरी स्कूलमध्ये हिंदी दिवस सोहळा समादेशक ब्रिगेडीयर एम. एम. मसुरी, विशीष्ट सेवा मेडल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी हिंदी नाटिका सादर करण्यात आली.
नाशिक- भोसला मिलीटीरी स्कूलमध्ये हिंदी दिवस सोहळा समादेशक ब्रिगेडीयर एम. एम. मसुरी, विशीष्ट सेवा मेडल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी हिंदी नाटिका सादर करण्यात आली. तसेच हिंदी भाषा शिक्षक शक्ती पुराणिक यांनी काव्य वाचन केले. तर शिक्षीका एन. एस. दलाल यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. एम. पी. मराळकर यांनी हिंदी भाषेला देण्यात आलेल्या राष्ट्रभाषेच्या दर्जा विषयी माहिती दिली. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन यावेळी मसुरी यांनी केले. शाळेचे प्राचार्य एम. एन. लोहकरे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार धनश्री निकम यांनी केले.
रासबिहारी स्कूल
संवादाचे माध्यम म्हणून अनेक शतकांपासून वापरल्या जाणा-या हिंदी भाषेच्या दिनानिमित्त रासबिहारी स्कूलमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. यानिमित्ताने शिक्षकांनी आॅनलाईन कार्यक्रमात हिंदी भाषेचे महत्व सांगितले. यावेळी पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी कविता सादर केल्या. सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य लेखन, निबंध लेखन, कविता सादरीकरण हे कार्यक्रम संपन्न झाले. आदीतेज देवरे, आर्या मिश्रा, आन्या अग्रवाल यांनी चित्रफितीव्दारे हिंदी भाषेचे महत्व सांगितले. रागिनी मिश्र व संदीप होळकर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बालक मंदिर
नाशिक- मध्यवर्ती हिंदु सैनिक शिक्षण मंडळ संचलित बालक मंदिरात इयत्ता पाचवी ते सातवी मराठी माध्यम (भोसला) या विभागात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसाची माहिती सांगितली.इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी कविता वाचन, गीत गायन, शब्दकोडे इत्यादीचे सादरीकरण केले, तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना वस्तुंची हिंदी भाषेतून ओळख करून देण्यात आली. शाळेच्या विभागप्रमुख नीता पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.