हिंदी, मराठी संगीत रजनी रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:25 AM2019-01-22T01:25:18+5:302019-01-22T01:25:33+5:30
सोला बरस की बाली उमर को सलाम, जाता कहा है दिवाने, निले निले अंबर पर, सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही, हसता हुवा नूरानी चेहरा, बोले रे पपी, दिल चीज क्या है, ये मेरा दिल प्यार का दिवाना अशा एकापेक्षा एक सुमधूर हिंदी-मराठी गिते शौर्य संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी संगीत रजनीमध्ये सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
नाशिकरोड : सोला बरस की बाली उमर को सलाम, जाता कहा है दिवाने, निले निले अंबर पर, सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही, हसता हुवा नूरानी चेहरा, बोले रे पपी, दिल चीज क्या है, ये मेरा दिल प्यार का दिवाना अशा एकापेक्षा एक सुमधूर हिंदी-मराठी गिते शौर्य संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी संगीत रजनीमध्ये सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
दत्तमंदिर बसथांबा पाठीमागील ऋतुरंग भवनमध्ये रविवारी झालेल्या संगीत रजनी कार्यक्रमाचे उद्घाटन नाट्य परिषदेचे नाशिक शाखेचे प्रमुख कार्यवाह सुनिल ढगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापुजन करून झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गायिका सुमित्रा पाटोळे, संयोजक सुदीप पाटोळे, अतुल गांगुर्डे, राजेंद्र उबाळे, अमर ढेंगळे आदि मान्यवर उपस्थित होते.
सुमित्रा पाटोळे यांच्या संगीत दिग्दर्शनात अकदामीच्या विद्यार्थ्यांनी हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे हे गीत प्रारंभी सादर केले. त्यानंतर आई मला खेळायला जायचंय या गीतासह विविध हिंदी-मराठी गिते सादर केली. ढोलकीवर राजेंद्र उबाळे, की-बोर्डवर अतुल गांगुर्डे, आॅक्टोपॅडवर अमर ढेंगळे यांनी साथसंगत केली. संजय लोळगे यांनी सूत्रसंचलन केले.