हिंदी ही देशातील सर्व भाषांची जननी : थत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 10:17 PM2019-10-13T22:17:33+5:302019-10-14T00:26:19+5:30
हिंदी भाषा ही सर्वांत प्राचीन तसेच सर्व भाषांना समाविष्ट करून निर्माण झालेली भाषा आहे. तसेच हिंदी भाषा ही भारताची संस्कृती असून, सर्व भाषांची जननी म्हणून ओळखली जाते. या भाषेने साहित्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात अनेक साहित्यिक तयार झाले व त्यांनी या भाषेला अजून समृद्ध केले आहे, असे प्रतिपादन एलआयसीच्या पूर्व राजभाषा अधिकारी जयश्री थत्ते यांनी केले.
नाशिक : हिंदी भाषा ही सर्वांत प्राचीन तसेच सर्व भाषांना समाविष्ट करून निर्माण झालेली भाषा आहे. तसेच हिंदी भाषा ही भारताची संस्कृती असून, सर्व भाषांची जननी म्हणून ओळखली जाते. या भाषेने साहित्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात अनेक साहित्यिक तयार झाले व त्यांनी या भाषेला अजून समृद्ध केले आहे, असे प्रतिपादन एलआयसीच्या पूर्व राजभाषा अधिकारी जयश्री थत्ते यांनी केले. अखिल हिंदी साहित्य सभेच्या वतीने रविवारी (दि. १३) आयोजित राष्टÑीय हिंदी साहित्य पुरस्काराच्या कार्यक्रमप्रसंगी विशेष अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
अखिल हिंदी साहित्य सभा यांच्या वतीने हिंदी साहित्यिकांचा सन्मान करता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण देशातून आलेल्या साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती गोविंद झा, अहिसासचे अध्यक्ष सुबोधकुमार मिश्र, विद्या चिटको हे उपस्थित होते. यावेळी ‘विद्याभारती’ स्मरणिकेचे प्रकाशन तसेच लेखिका सरिता सिंघाई यांच्या ‘कोहिनूर’ व वृषालिनी सानप या लेखिकेच्या ‘अश्को के मोती’ या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले. तसेच दुपारच्या सत्रात कार्यक्रमात हास्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आनंद राज आनंद, विनय कुमार शर्मा हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित हास्य कवींनी आपल्या शैलीत कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
या साहित्यिकांचा सन्मान
यावेळी साहित्य साधना पुरस्कार डॉ. संकर्षण प्रजापती, विद्योतमा साहित्य सन्मान मंजूला जोशी, साहित्य शिरोमणी सन्मान राम नगीना मौर्य, साहित्य सृजन सन्मान ज्ञान चंद मर्मज्ञ, साहित्य आराधना सन्मान राजेश्वर वशिष्ठ, स्व. महादेवी वर्मा सन्मान पूनम प्रसाद, साहित्य गौरव सन्मान रामकृष्ण सहस्त्रबुद्धे, साहित्यभूषण सन्मान हा पुरस्कार पाच जणांना देण्यात आला. यात दिनेश चतुर्वेदी, अलका प्रमोद, रंजना फत्तेपूरकर, बनवारीलाल जाजोदिया, डॉ. बापूराव देसाई यांना देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवी सन्मान डॉ. बाळकृष्ण महाजन यांना तर अहिसास गरिमा सन्मान मोसमी पाटील यांना प्रदान करण्यात आला.