हिंदू जनजागृती समितीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:35 AM2018-02-24T00:35:37+5:302018-02-24T00:35:37+5:30

मदरशांना मिळणारे अनुदान बंद करावे तसेच काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 Hindu Janajagruti Samiti's demonstrations | हिंदू जनजागृती समितीची निदर्शने

हिंदू जनजागृती समितीची निदर्शने

googlenewsNext

नाशिक : मदरशांना मिळणारे अनुदान बंद करावे तसेच काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी अलीकडेच मदरशांमध्ये अतिरेकी तयार केले जातात अशी कबुली दिली आहे. अनेक मदरशा चालकांनी मोठ्या प्रमाणावर अनुदानात गैरव्यवहारही केला असल्यामुळे मदरशांना मिळणारे अनुदान बंद करण्यात यावे.  काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करून अतिरेक्यांना पळवून लावण्याचे प्रकार केले जात आहेत, कारवाई करणाºया सैनिकांविरुद्ध पोलिसात गुन्हेही नोंदविले जात आहेत. त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य खच्चीकरण होत असून, सैनिकांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करू द्यावे, देशद्रोही कायद्यान्वये दगडफेक करणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत व काश्मीरमध्ये राष्टÑपती राजवट लागू करावी, अशी मागणीही हिंदू जनजागृती समितीने केली आहे. यावेळी आंदोलनात शशीधर जोशी, वैशाली कातकाडे ज्योती पंडित आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कठोर कारवाई करण्याची मागणी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने २६ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील कासवगंज येथे तिरंगा यात्रा काढली होती, या यात्रेवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली व त्यातून जातीय तणाव निर्माण झाला. भारतातच तिरंगा यात्रा काढण्यावर एक प्रकारे बंदी घालावी अशीच समाजकंटकांची कृती असल्यामुळे कासवगंज येथे दगडफेक करणाºयांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Web Title:  Hindu Janajagruti Samiti's demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.