हिंदूंनादेखील अॅट्रॉसिटीचे कवच हवे महंत पंडित : सटाणा येथे हिंदू धर्म संस्कृतिरक्षक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:28 PM2018-03-22T23:28:24+5:302018-03-22T23:28:24+5:30
सटाणा : देशात आज धर्माच्या नावाखाली हिंदूंचा छळ होत आहे. गोरक्षकांना सापत्नपणाची वागणूक मिळत आहे.
सटाणा : देशात आज धर्माच्या नावाखाली हिंदूंचा छळ होत आहे. गोरक्षकांना सापत्नपणाची वागणूक मिळत आहे. हिंदू म्हणून या देशात जगण्याचा अधिकारच हिरावून घेतला जात असेल तर धर्माच्या आड येणारा कायदा आम्हाला मंजूर नाही. अल्पसंख्याकांवर अन्याय होतो त्यामुळे त्यांना अॅट्रॉसिटीचे कवच दिले जात असेल, तर हिंदू म्हणून आम्हाला हिणवणे हादेखील आमचा अपमान आहे. त्यामुळे हिंदूंनासुद्धा अॅट्रॉसिटीचे कवच बहाल करावे, असे मत हिंदू धर्म संस्कृतिरक्षक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत पंडित गुरु जी यांनी व्यक्त केले.
हिंदू धर्म संस्कृतिरक्षक संघातर्फे येथील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सव पटांगणावर आयोजित चौथ्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महंत पंडित गुरुजी बोलत होते. आयुर्वेदाचार्य महंत श्री श्री १००८ माधवानंद सरस्वती महाराज अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वामी सागरानंद सरस्वती, देवमामलेदार देवस्थानचे अध्यक्ष व अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष भालचंद्र बागड, सतीशदास मोघे महाराज, आचार्य जगद्गुरु, यतीवर्य स्वामी, जगद्गुरु द्वारकाचार्य माधवानंद तीर्थस्वामी, श्री श्री १००८ आयुर्वेदाचार्य स्वामी महाराज, महंत भवरगिरी महाराज, डॉ. रघुनाथदास महाराज, गिरिजानंद सरस्वती, काशीनाथदास पाटील, ईश्वरदास चºहाटे, आनंददास कजवाडेकर, नंदाराम करंजाळीकर, साईदास महाराज, भागवताचार्य शास्त्री, योगानंद पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, देवस्थानचे उपाध्यक्ष दादाजी सोनवणे, सचिव धर्मा सोनवणे, रमेश देवरे, कौतिक सोनवणे, रमेश सोनवणे, राजेंद्र भांगडिया, हेमंत सोनवणे, बाबूराव सोनवणे, प्रवीण पाठक, वारकरी संप्रदायाचे संभाजी महाराज बिरारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, बा. जि. पगार, स्वप्निल बागड, मनोज अमृतकर, योगेश अमृतकार आदींसह नाशिक, नगर, धुळे, पुणे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील हिंदू बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. बी. टी. शेळके यांनी प्रास्ताविक केले.