हिंगणवेढेला दहा एकरांवरील ऊसशेती बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 01:02 AM2022-02-10T01:02:29+5:302022-02-10T01:03:06+5:30

एकलहरे येथून जवळच असलेल्या हिंगणवेढे शिवारातील दहा एकरांवरील ऊसशेती शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये बेचिराख झाली. मंगळवारी (दि.८) ही घटना महावितरणच्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन उडालेल्या ठिणगीमुळे घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. \

Hinganvedhela bechirakh sugarcane cultivation on ten acres | हिंगणवेढेला दहा एकरांवरील ऊसशेती बेचिराख

हिंगणवेढेला दहा एकरांवरील ऊसशेती बेचिराख

Next
ठळक मुद्देवाऱ्यामुळे आगीचा राैद्रावतार : वीजतारांचे घर्षण होऊन ठिणगी पडल्याने भडका

एकलहरे : येथून जवळच असलेल्या हिंगणवेढे शिवारातील दहा एकरांवरील ऊसशेती शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये बेचिराख झाली. मंगळवारी (दि.८) ही घटना महावितरणच्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन उडालेल्या ठिणगीमुळे घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. \

हिंगणवेढे येथील शेतकरी नरहरी शंकर धात्रक, किसन भिमाजी धात्रक, पांडुरंग काशीनाथ उगले, वाल्मिक जयवंत धात्रक, सोमनाथ किसन वाघ, वामन विठोबा धात्रक, संपत गोविंदा धात्रक, शाम विष्णू धात्रक, नरहरी विठोबा विंचू, कचरु दगडू धात्रक, रमेश दगडू धात्रक, संतोष सुरेश धात्रक आदी शेतकऱ्यांचा ऊस अगीत भस्मसात झाला. वीजतारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने आगीचा भडका उडाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेला विद्युत वितरण कंपणी जबाबदार असून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणेकामी योग्य ती कार्यवाही करावी तसेच विद्युत तारा, विद्युत पोल हे खूप जुने झाले असून दोन पोलमधील अंतर जास्त असल्याने विद्युत तारा शेतीच्या दिशेने लोंबकळत असल्याचे सांगितले. याबातीत हिंगणवेढ्याच्या शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून घटनास्थळी आलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांना निवेदनही दिले.

--इन्फो--

अन्यथा तीव्र आंदोलन

अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनावर सरपंच राजू धात्रक, उपसरपंच मीराबाई विंचु यांच्यासह शेतकरी अशोक धात्रक, पांडुरंग उगले, वाल्मिक धात्रक, किसन धात्रक, गोकुळ धात्रक, खंडु धात्रक यांच्यासह सुमारे चाळीस शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, वीज वितरण सामनगाव सबस्टेशनचे सहाय्यक अभियंता कसबे व त्यांचे कर्मचारी, कृषी सहाय्यक श्रीमती फुसे, गंगाराम धात्रक व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

Web Title: Hinganvedhela bechirakh sugarcane cultivation on ten acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.