हिंगणवेढे येथे बिबट्याच्या मादीचा व बछड्याचा भरिदवसा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 04:49 PM2018-09-09T16:49:27+5:302018-09-09T16:49:33+5:30

चांदोरी : नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे गावातील गोपाळवाडी परिसरात मागील काही दिवस पासून बिबट्याच्या मादी सह बछड्याचा संचार आहे. मंगळवारी पहाटे 4 हिंगणवेढे गावामध्ये (महादेव मंदिर परिसर ) राम किसन मोरे यांच्या शेळी वर बिबटया कडून शेळी फस्त करण्यात आली. तसेच बुधवार रोजी रात्री 8 च्या दरम्यान साहेबराव निवृत्ती धात्रक यांच्या कुत्र्यावर हल्ला करण्यात आला होता. या घटना मुळे गोपाळवाडी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरीकांनी केली आहे बिबट्याची मादी व पिल्ले दिवसा संचार करत असल्याने येथील नागरिकांना एकटे फिरणे अवघड झाले आहे

Hinge Vede is a leopard's fierce communication | हिंगणवेढे येथे बिबट्याच्या मादीचा व बछड्याचा भरिदवसा संचार

हिंगणवेढे येथे बिबट्याच्या मादीचा व बछड्याचा भरिदवसा संचार

Next
ठळक मुद्दे गोपाळवाडी परिसरात पिंजरा लावण्याची मागणीकरून सुध्दा वनविभागाचे दुर्लक्ष

चांदोरी : नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे गावातील गोपाळवाडी परिसरात मागील काही दिवस पासून बिबट्याच्या मादी सह बछड्याचा संचार आहे. मंगळवारी पहाटे 4 हिंगणवेढे गावामध्ये (महादेव मंदिर परिसर ) राम किसन मोरे यांच्या शेळी वर बिबटया कडून शेळी फस्त करण्यात आली. तसेच बुधवार रोजी रात्री 8 च्या दरम्यान साहेबराव निवृत्ती धात्रक यांच्या कुत्र्यावर हल्ला करण्यात आला होता.
या घटना मुळे गोपाळवाडी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी नागरीकांनी केली आहे बिबट्याची मादी व पिल्ले दिवसा संचार करत असल्याने येथील नागरिकांना एकटे फिरणे अवघड झाले आहे
गोपाळवाडी येथे ऊस क्षेत्र मोठया प्रमाणत आहे.व उसाची शेती हे बिबटया साठी लपण्याचे क्षेत्र आहे.
तसचे बिबट्या च्या दहशतीमुळे शेतीकामासाठी शेतमजूर काम करण्यास तयार नाही व काही मजूर रोजगार वाढून मागत आहे.या घटनांचा शेती कामावर परिणाम होत आहे. संध्या शेतीची कामे सुरू असल्याने महिला व मजूरा मध्ये भीतीचे वातावरण आहे रात्रीच्या वेळी घरातुन बाहेर पडणेही मुश्किल झाले आहे.तरी या घटनेची वनविभागाणे गंभीर दखल घ्यावी व गोपाळवाडी परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.
""पंधरा दिवसापासून बिबट्याची मादी व बछड्याचा भर दिवसा संचार होत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे वनविभागाकडे वारंवार मागणी करून सुध्दा पिंजरा लावला जात नसल्याचे व वनविभागाने या कडे दुर्लक्ष करत असल्याने ,बिबट्या हल्ला झाला तर त्याला वनविभाग जबाबदार असेल.
----------------आकश साहेबराव धात्रक (स्थानिक नागरिक)

 

Web Title: Hinge Vede is a leopard's fierce communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.