हिरावाडीत बिबटयाचे दर्शन? नागरीकांत चर्चा: भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 03:46 PM2017-09-06T15:46:59+5:302017-09-06T15:47:06+5:30
नाशिक : कधी दिंडोरीरोडवरील जलविज्ञान प्रकल्प तर कधी मखमलाबाद, बोरगड, म्हसरूळ परिसरात संचार असलेल्या बिबटयाने काल मंगळवारी (दि. ५) रात्रीच्या सुमाराला हिरावाडीतील पाटाजवळ दर्शन दिल्याचे वृत्त पसरले आहे. हिरावाडीत बिबटया दिसल्याचे वृत्त पसरल्याने नागरीकांत भितीचे वातावरण पसरले असुन हिरावाडीतही बिबटयाचा संचार असल्याचे मेसेज सोशल मिडीयावर फिरत आहे.
गेल्या महिन्यात तारवालानगर परिसरातील रस्त्यावर सायंकाळच्या सुमाराला काही नागरीकांनी बिबटयाला बघितले होते त्यानंतर मेरी येथिल जलविज्ञान प्रकल्पच्या आवारात बिबटयाच्या हल्लयात श्वानाचे पिल्लू ठार केल्याने व बिबटयाच्या पायांचे ठसे आढळल्याने बिबटयाचा संचार असल्याचे स्पष्ठ झाले होते त्यानंतर मखमलाबाद परिसरात बिबटया मुक्तपणे संचार करीत असल्याचे चित्रण कॅमेºयात कैद झाले होते. वनविभागाने देखिल दखल घेऊन परिसरातील काही ठिकाणी बिबटयाला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता मात्र अद्याप पावेतो बिबटया जेरबंद झालेला नाही.
काल रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या सुमाराला पाटकिनारी असलेल्या परिसरात काही नागरीकांना बिबटया दिसल्याचे वृत्त आहे मात्र नेमका बिबटया कुणाला दिसला याबाबत सखोल माहीती नाही. पाटकिनारी बिबटया फिरत असल्याचे मेसेज व्हॉटअॅपवर रात्री उशिरा पावेतो फिरत असल्याने नागरीकांनी एकमेकांना फोन करून खात्री क रण्याचे काम सुरू केले होते. परिसरात बिबटया फिरत असल्याने नागरीकांनी सतर्क राहावे असे मेसेज वाचून नागरीकांच्याही काळजाचा ठोका चुकत आहे. पाटकिनारी मागील परिसरात दाट झाडी असल्याने या परिसरात बिबटया मुक्तपणे रात्रीच्यावेळी संचार करण्याची शक्यता असल्याचे काही नागरीकांनी बोलून दाखविले आहे. हिरावाडीतील पाटकिनारी बिबटयाचे दर्शन घडल्याचे वृत्त पसरल्याने सध्या तरी हिरावाडीतील नागरीकांत काहीसे भितीचे वातावरण पसरले आहे.