हिरावाडीत पाटाला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:19 AM2019-10-05T00:19:56+5:302019-10-05T00:20:45+5:30

आता गेल्या अनेक दिवसांपासून भगदाड पडलेला पाण्याच्या पाटाचा तो भाग तसाच असल्याने शासनाच्या संबंधित विभागाने मातीचा बांध टाकण्यासाठी भर टाकणे गरजेचे आहे.

Hirawadi crosses the bridge | हिरावाडीत पाटाला भगदाड

हिरावाडीत पाटाला भगदाड

Next
ठळक मुद्देपरिसरात धोका : संरक्षित भिंत बांधण्याची मागणी

पंचवटी : गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाणी वाहून जाण्यासाठी प्रशासनाने पाइप टाकले असले तरी त्यातून पाणी न गेल्याने नागरिकांनी पाण्याचा निचरा व्हावा म्हणून पाटालाच किमान पाच फूट रुंद व सात ते आठ फूट लांब भगदाड पाडून साचलेल्या पाण्याचा निचरा केला होता. मात्र आता गेल्या अनेक दिवसांपासून भगदाड पडलेला पाण्याच्या पाटाचा तो भाग तसाच असल्याने शासनाच्या संबंधित विभागाने मातीचा बांध टाकण्यासाठी भर टाकणे गरजेचे आहे.
हिरावाडीत असलेल्या जॉगिंग ट्रॅकला लागून कालवा आहे. गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडात जॉगिंग ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. साचलेले पाणी वाहून जावे यासाठी म्हणून पाटाच्या मातीचा भर काढून त्याठिकाणी भगदाड पाडण्यात आले. सध्या पावसाळा सुरू असून आगामी कालावधीत पाटाला वाहते पाणी सोडले तर भगदाडामुळे माती खचून अजून मोठे भगदाड पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वतीने भगदाड पडलेल्या ठिकाणची पाहणी करून सदर कालव्याला पडलेले भगदाड दुरुस्ती करण्याचे काम तत्काळ करावे, अशी मागणी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे. सदर जॉगिंग ट्रॅकवर अनेकदा परिसरात राहणारे लहान मुले फेरफटका मारण्यासाठी येत असतात. पाटाला वाहते पाणी सोडलेले असेल त्यावेळी लहान मुले खेळण्याच्या नादात त्या भगदाडातून पाण्याच्या पाटात पडून काही दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरणार आहे.

Web Title: Hirawadi crosses the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.